Headlines

ब्रेकअपनंतरही साराला सतावतेय Kartik Aaryan ची आठवण?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या कोरोनाच्या विळख्यात आहे. अभिनेता लवकर कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर यावा, अशी  चाहत्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, सारा अली खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती कार्तिकबद्दल बोलत आहे. साराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये साराला कार्तिकच्या ‘भूल भूलैया 2’ सिनेमाच्या यशाबद्दल विचारताना दिसत आहेत. सिनेमा यंदाच्या वर्षातील कमी दिवसांत शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचणारा सिनेमा ठरला आहे. दरम्यान, सारा अली खाननेही या अभिनेत्याचे कौतुक केलं, पण हटके अंदाजात. 

कार्तिकचं कौतुक करत सारा म्हणाली, ‘सिनेमा चांगला चालला आहे त्याबद्दल मला सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. सिनेमा चांगला आहे आणि इंडस्ट्रीलाही त्याची गरज आहे…’ अशा शुभेच्छा साराने कार्तिक आणि सिनेमाच्या टीमला दिल्या आहेत. 

यानंतर, जेव्हा साराला विचारण्यात आले की, ती कार्तिकला मिस करत आहे का? यावर सारा धन्यवाद म्हणत कोणतेही उत्तर न देता तेथून निघून जाते.’ सध्या साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सारा आणि कार्तिक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, कार्तिक आर्यन हा सारा अली खानचा क्रश होता.  साराने स्वतः करण जोहरच्या शोमध्ये वडील सैफ अली खानसमोर याची कबुली दिली होती. 

यानंतर कार्तिक आणि साराने एकत्र एक सिनेमा  देखील केला, ज्याचं नाव होतं – ‘लव्ह आज कल 2’. या सिनेमानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू होती, मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून दुरावले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *