Headlines

Breaking Bad फेम अभिनेत्याचे आकस्मिक निधन

[ad_1]

Breaking Bad Actor Death: ‘नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘ब्रेकिंग बॅड’ या वेबसिरिजमधील अभिनेत्याचे अचानक निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबियांनी दिली. ओटीटीवर गाजलेली सर्वाधिक लोकप्रिय सिरिज ब्रेकिंग बॅडमध्ये त्यांची प्रमुख भुमिका होती. त्यांच्या निधनानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. माईक बेटाये यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबियांनी ही माहिती दिली. सोबतच त्यांनी लोकप्रिय ब्रेकिंग बॅड या वेबसिरिजमध्ये काम केले होते. डेनिस मार्कोव्सक्सी असं त्यांच्या पात्राचे नावं होते. त्यांचे राहत्याच घरीच निधन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचे निधन 1 जून रोजी झाले आहे. त्यांच्या बहिणीनंही माहिती दिली आहे. 

त्यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनीही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मित्र रोला नशेफ यांनी फेसबुक त्यांच्या निधनाची बातमी ऐकून शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले, ”या बातमी मी खूप दु:खी आहे. तू सगळ्यांचाच मित्र होता. तू विनोद, तूझं टेलेंट, लेखन, अभिनय सगळंच खूप खरं, बिनधास्त आणि वेगळं होतं. मी तुझ्या बहीणी, भाचे, नातेवाईक, भांवडं यांच्यासाठी प्रार्थना करीन. तूझ्या जाण्यानं तूझ्या परिवारासाठी पोकळी निर्माण झाली आहे. तूझ्या आत्माला शांती लाभो, तू खूप सच्चा मित्र आहेस”. 

व्हरायटीनं दिलेल्या रिपोर्टनूसार, 16 जून रोजी दुपारी 2 वाजता प्लायमाउथ, मिच येथील व्हर्म्युलेन-सेजेव्स्की फ्युनरल होम येथे त्यांची शोकसभा आहे. तर योर्ग केरोसियटीस या त्यांच्या एका को-स्टारनंही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ”तू आमचा सुपरस्टार होतास मी तूझ्याकडून खूप शिकले. तू सर्वाधिक विनोदी माणूस होतास”. सोशल मीडियावर अनेक जण त्यांना श्रद्धाजंली वाहत आहेत. या बातमीनं सगळ्यांनाच दु:ख झाले आहे. 

त्यांच्या परिवारानं दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर ज्यांचे प्रेम होते त्यांना त्यांच्या जाण्यानं खूपच धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना आम्ही मिस करू. तो कायमच सगळ्यांना त्यांच्या आनंदानं आणि आठवणीनं मिस करेन. ‘ब्रेकींग बॅड’सह त्यांनी ‘एट्स ऑलवेस सन इन फिलाडेलफिया’, ‘बॅटल क्रिक’, ‘सीएसआय: मायामी’, ‘जेसी’ तसेच ‘एव्हरीबडी लव्ह्स रेमंड’ या मालिकेतून कामं केली आहेत. त्यांनी एक्स-मेन-डे्स ऑफ फ्यूचर पास्ट या चित्रपटासाठी व्हॉईसओव्हर दिला होता. सध्या कलाकारांच्या एकामागून एक येणाऱ्या निधनाच्या बातम्यांनी सिनेसृष्टी अक्षरक्ष: हादरली आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांची शोकशभाही होणार आहे. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *