Headlines

“दोन जिल्हे अबाधित राखायला मी समर्थ” बंडखोर आमदारांविरोधात अनंत गिते आक्रमक | shivsena leader anant gite on rebel mla ratnagiri raigad visit press conference rmm 97

[ad_1]

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आहे. यानंतर आता शिवसेनेनं पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. तर शिवसेना नेते अनंत गितेदेखील रायगड आणि रत्नागिरी दौऱ्यावर गेले आहे. शिवसेना संकटात असताना, पक्षाच्या पाठीशी उभं राहणं, ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रायगड-रत्नागिरी दौऱ्यादरम्यान ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना गिते म्हणाले, “इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बंडखोरीची बातमी जेव्हा कळली, तेव्हाच मी स्वत: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. दौऱ्याला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन करून याची कल्पना दिली. मी आता रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहे. या दोन जिल्ह्यांची जबाबदारी मी स्वीकारली आहे. हे दोन्ही जिल्हे अबाधित राखायला मी समर्थ आहे. त्यामुळे जी बंडखोरी झाली आहे, त्याची चिंता तुम्ही अजिबात करू नका, असा विश्वास मी त्यांना दिला” अशी माहिती अनंत गिते यांनी दिली.

हेही वाचा- “मातोश्रीविरोधात बोलणार नाही असं ठरवलं होतं, पण…” गद्दारीवरून संजय शिरसाट यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

“दुर्दैवाने या दोन जिल्ह्यातून रायगडचे तीन आणि रत्नागिरीचे दोन अशा पाच आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे एक शिवसैनिक म्हणून संकटाच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहणं, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. याच भूमिकेतून मी स्वत:हून हा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून मी कडवट शिवसैनिकांना शिवसेनेच्या आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी उभं करण्याचा प्रयत्न करतोय, यात मला १०० टक्के यश येत आहे,” असंही गिते म्हणाले.

हेही वाचा- शिंदे गटाच्या बंडखोरीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? यापूर्वी असा प्रयत्न झाला होता का? उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला गौप्यस्फोट

शिवसेना ही शिवसेनाच आहे. त्यामध्ये भेद करता येणार नाही, खरी शिवसेना कुणाची आणि खोटी शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. आजचं बंड हे भाजपा पुरस्कृत बंड आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या ५ आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदार संघात नवीन उमेदवाराचा उदय होणार आहे, असं विधानही अनंत गिते यांनी केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *