Headlines

बाळाला कुशीत घेऊन ढसाढसा का रडतेय अभिनेत्री ?

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या तिच्या कोणत्याही कलाकृतीपेक्षा अधिक चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळं. सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्या रिलेशनशिपमध्ये काही दिवसांपूर्वी ब्रेकअपचं वादळ आलं. त्या चर्चांमध्येतच तिच्या भावाच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं गेलं आणि आता तिच्या वहिनीचा एक रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

परिणामी सुष्मिताच्या आयुष्यात नेमकं चाललंय काय हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मुलगी कुशीत असतानाही सुष्मिताची वहिनी अभिनेत्री चारु असोपा नेमकी का रडतेय हेच अनेकांना कळेना. (charu asopa sen)

हा व्हिडीओ संपूर्ण पाहिला असता नेमकं काय घडलंय याची कल्पना येत आहे. व्हिडीओमध्ये मुलीला कुशीत घेऊन चारु भावनिक झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. आई होणं ही जगातील अद्वितीय भावना, अनुभव असल्याचं ती इथं म्हणताना दिसत आहे. 

आई होण्याचा आपला प्रवास सांगताना तिनं ज्या गोष्टींचा सर्वांपुढे उलगडा केला ते ऐकताना अनेकांनीच या अनुभवाशी आपणही नकळत जोडलो गेलो असल्याची प्रतिक्रिया दिली. 

कोणत्याही महिलेसाठी एक जीव आपल्या गर्भात वाढवणं आणि त्यानंतर त्याला मोठं होताना पाहणं ही नेमकी किती महत्त्वाची आणि भावनिक बाब असते हेच चारुचा अनुभव ऐकताना लक्षात येत आहे. 

सुष्मिता आणि चारुचं नातं म्हणावं तर हे नणंद भावजयीचं नातं कायमच सर्वांची मनं जिंकताना दिसतं. विविध फोटो, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या दोघीजणी कायमच सर्वांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *