Headlines

Block spam calls: वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्स-मेसेजला वैतागला? ‘या’ सोप्या टिप्सने मिनिटात दूर होईल समस्या

[ad_1]

नवी दिल्ली :DND Service Activate: तुमच्याकडे मोबाइल असेल तर वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्सला तुम्ही देखील वैतागला असाल. अनेकदा जाहिरात कंपन्या मेसेज आणि कॉल्स करून एकप्रकारे त्रासच देत असतात. बऱ्याचवेळा महत्त्वाच्या कामात असताना असे स्पॅम कॉल्स येतात. तुम्ही देखील अशा स्पॅम कॉल्स व मेसेजला वैतागला असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. अगदी सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही जाहिरात कंपन्यांच्या स्पॅम कॉल्स व मेसेजला बंद करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ डू-नॉट-डिस्टर्ब सर्विसला (DND) अ‍ॅक्टिव्हेट करायला लागेल. DND सर्विसला अ‍ॅक्टिव्हेट केल्यावर तुम्हाला अशाप्रकारचे कॉल्स येणार नाहीत.

वाचा: वर्क फ्रॉम होम ते कर्मचाऱ्यांची कपात… Twitter च्या कर्मचाऱ्यांसमोर Elon Musk यांनी ‘या’ मुद्यांवर मांडले मत

डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) चा उपयोग करून ग्राहक स्पॅम कॉल्स व एसएमएसपासून वाचू शकतात. ट्रायनेच (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकदा तुमच्या मोबाइल नंबरवर डीएनडी अ‍ॅक्टिव्हेट केल्यास, स्पॅम मेसेज आणि कॉल्स बंद होतील. तुम्ही जर वोडाफोन आयडिया (Vi) यूजर्स असाल तर DND सर्विस अ‍ॅक्टिव्हेट कशी करायची त्याबाबत जाणून घ्या.

वाचा: Jio-Airtel-Vi ला ग्राहकांनी दिला मोठा झटका, लाखो यूजर्सनी सोडली साथ; पाहा डिटेल्स

Vi यूजर्स असे अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात DND सर्विस

  • DND सर्विस अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला My Vi च्या वेबसाइटवर दिलेल्या DND Registration वर क्लिक करायचे आहे.
  • तुम्ही थेट https://www.myvi.in/dnd वर देखील क्लिक करू शकता.
  • आता ज्या नंबरवर डीएनडी सर्विस अ‍ॅक्टिव्हेट करायची आहे, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. आता तुमच्या नंबरवर ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकल्यानंतर Verify वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला Full आणि Partial असे दोन पर्याय मिळतील.
  • प्रमोशनल कॉल्स आणि SMS ला पूर्णणे बंद करण्यासाठी Full पर्याय निवडा.
  • सबमिटवर क्लिक केल्यानंतर DND सर्विस सुरू होईल.
  • अशाच प्रकारे तुम्ही इतर टेलिकॉम कंपन्यांशी देखील बोलून DND सर्विस अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. यामुळे तुम्हाला स्पॅम कॉल व मेसेज येणार नाही.

वाचा: Father’s Day: ‘हे’ कूल गॅजेट्स फादर्स डे बनवतील खास, वडिलांना गिफ्ट देण्यासाठी आहे बेस्ट पर्याय

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *