Headlines

BJP MLA Prasad Ladal’s reply to Kishori Pednekars criticism

[ad_1]

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधीच राजकारण चांगलचं तापलं आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटल्यापासून या दोन्ही एकमेकांवर सातत्यचाने टीका होताना दिसत आहे. ‘तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचे का? अशा शब्दात आशिष शेलारांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी आशिष शेलारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आता पुन्हा भाजपाकडून पेडणेकरांवर टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंचा उल्लेख कर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी पेडणेकरांना टोला लगावला आहे.

हेही वाचा- बुलढाण्याप्रमाणेच मिरजेतही शिंदेगट-शिवसेना आमनेसामने; पोलिसांच्या मध्यस्थीने वादावर तोडगा!

काय म्हणाले प्रसाद लाड

“उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख कुणी म्हणत नाही. उद्धव ठाकरेंसाठी कुटुंबप्रमुख ही व्याख्या हम दो और हमारे दो आणि मातोश्री के बाहर मत जाने दो अशी आहे”, असं म्हणत लाड यांनी पेडणेकरांना टोला लगावला आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला खूश करण्यासाठी बोलू नका असं उत्तर लाड यांनी दिले आहे.

आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना पत्र

“प्रति, श्री उद्धवजी ठाकरे, संपादक, सामना… महोदय,. आपण आमच्या कमळाला हिणवायला ‘बाई’ म्हणताय? हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?” असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. शिवाय पुढे “असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडेपण आहेत!” असा टोलाही लगावला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न करता फक्त “संपादक, सामना” असाच उल्लेख आशिष शेलार यांनी केल्यामुळे त्यावरून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे ‘शिवसेना आमचीच’, असा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना दुसरीकडे भाजपाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न केल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा- “माझा विरोधकांना एवढाच सल्ला आहे की त्यांनी…”, शरद पवारांच्या ‘त्या’ आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर!

काय म्हणाल्या होत्या किशोरी पेडणेकर

पेंग्विन सेना हे ते म्हणतातच. कमळाबाई हे केवळ आम्हीच नाही, त्यांचेही नेते बोलतात. प्रत्येक वेळी प्राणी, पक्ष्यांना मध्ये ओढू नये. प्राणी, पक्षी जसे कुटुंबवस्तल आहेत. तसा आमचा पक्ष कुटुंबवत्सल आणि उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख आहेत, अशा शब्दात किशोर पेडणेकर यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *