Headlines

bjp leader vilasrao Jagtap demand inquiry of congress mla vikramsinh sawant property through ed zws 70

[ad_1]

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : जतच्या आजी माजी आमदारामध्ये सध्या ईडी चौकशीच्या मागणीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून ही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीची एकमेकांना आव्हान देत रणमैदान गाजविण्याची तयारी दिसत आहे. भाजपचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या संपत्तीची सक्तवसुली संचालनलायामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिल्लीच्या सक्तवसुली संचालनालयाकडे एका पत्राद्वारे केली आहे, तर जतच्या डफळे सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरून आ. सावंत यांनी सवाल उपस्थित केला असून कारखाना अडचणीत आणल्यामुळे २२ हजार सभासदांची मालकी संपुष्टात येण्यास कोण कारणीभूत आहे, यामध्ये कोणते व्यवहार झाले, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> “जयंत पाटलांचा दावा सपशेल खोटा”, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यावरून भाजपा नेते अमित साटम यांचा पलटवार

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही जतमध्ये  आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात. होणारे आरोप हे पक्षीय पातळीवर कमी, वैयक्तिक पातळीवरच अधिक असतात. जत नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित सत्तेत असली तरी दोन्ही काँग्रेसचे विळय़ा-भोपळय़ाचे सख्य आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी असली आणि जिल्हा पातळीवर एका व्यासपीठावर असलेली मंडळी जत तालुक्यात प्रवेश करताच सवतासुभा मांडतात हा आजवरचा अनुभव आहे. जतचे राजकारणात किंगमेकर म्हणून जगतापांची एकेकाळी ओळख होती. मतदारसंघ खुला झाल्यानंतर जगताप यांना आमदारकीची संधी मिळाली असली तरी तत्पूर्वी त्यांनी कधी राष्ट्रवादीशी तर कधी भाजपशी सोयरिक करत सत्तेवर मांड ठोकण्याचा कायम प्रयत्न केला. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आ. सावंत यांनी जगताप पुत्र मनोज जगताप यांना मागील निवडणुकीत पराभूत केले. त्यानंतर हा सवतासुभा कायमच टोकाचा होत  गेला. याची परतफेड जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये आ. सावंत यांना पराभूत करून प्रकाश जमदाडे यांना विजयी करून केली. भाजपमध्ये असलेले प्रकाश जमदाडे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये गेले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपप्रणीत आघाडीतून बँकेत संचालक होत असताना त्यांनी आ.सावंत यांचा पराभव केला.

हेही वाचा >>> “अजित पवारांना मुख्यमंत्री करा” सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर, उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या…

या मागे भाजपची शक्ती होतीच, जमदाडे निवडून येण्यापेक्षा आमदारांना पराभूत केले यातच भाजपचा आनंद मोठा होता.हा एकप्रकारे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने दिलेला शह होता. कधी बाजार समिती, कधी नगरपालिका, कधी जिल्हा बँक या माध्यमातून हा सत्तासंघर्ष कायम पाहण्यास मिळत आहे. माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे आ. सावंत हे मावसबंधू आहेत. जगताप यांचा जिल्हा पातळीवर कदम गटाला असलेला विरोध जतमध्येही आमदार गटाला अधिक टोकदार होतो आहे. यातूनच त्यांनी आ. सावंत यांच्या बेनामी संपत्तीच्या चौकशीची आग्रही मागणी केली आहे.

 यामध्ये बाजार समितीच्या जमीन खरेदी व्यवहार, जिल्हा व बाजार समिती नोकरभरती, पतसंस्थेमध्ये असलेल्या बेनामी ठेवींबाबत प्रश्न उपस्थित करीत बेनामी संपत्तीचीच चौकशी करण्याची आग्रही मागणी माजी आमदार जगताप यांनी केली आहे. ईडी चौकशीचे  आमदार सावंत यांनी स्वागतच केले आहे.

माझ्या संपत्तीची चौकशी करत असताना २२ हजार सभासदांच्या मालकीचा असलेला डफळे सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात  का गेला, त्याचे हस्तांतरण राजारामबापू कारखान्याकडे कोणाच्या कालावधीत झाले, याचीही चौकशी करण्याची मागणी करीत तालुक्यात हॉटेल, इंधन पंप, स्थावर संपत्ती कोणाची अधिक आहे याचीही चौकशी करण्याची मागणी आ. सावंत यांनी केली आहे.

जतचे आ. विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हा बँकेचे संचालक असताना बँक आणि बाजार समिती नोकरभरतीमध्ये लाखो रुपयांची माया कमावली आहे. त्यांच्या पतसंस्थेमध्ये बेनामी ठेवी असून या ठेवीतून कर्नाटकातील बिगर सभासदांना कर्ज वितरण केले जाते याचीही चौकशी सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून व्हावी

विलासराव जगताप, माजी आमदार

माजी आमदारांमुळे तालुक्यामध्ये हॉटेल संस्कृती फोफावल्याने अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत. २२ हजार सभासदांच्या डफळे सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण कसे झाले याचीही चौकशी सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून व्हावी. ईडी चौकशीचे आपण स्वागतच करतो

 – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस आमदार



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *