Headlines

bjp leader Atul Bhatkhalkar criticizes uddhav-thackeray-over vedant-foxcon project

[ad_1]

वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. वेदान्त प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आऱोप-प्रत्यारोप होत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प जाण्यासाठी दोन्ही गट एकमेकांना जबाबदार धरताना दिसत आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर वेदांता प्रकल्प गुजरातला दिल्याचा आरोप केला जात आहे. तर एवढा मोठा प्रकल्प दुसरीकडे कसा जाऊ शकतो? असे म्हणत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका केली जात आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी वेदान्ता प्रकल्पावरु प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेवरून भाजपा नेते अतुल भातखळकरांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- “वेदान्त प्रकल्प महाराष्ट्रात…”, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेवर हल्लाबोल; म्हणाले, “पेंग्विन जावाईशोध…”

भातखळकरांचा टोला

प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केले : उद्धव ठाकरे यांची वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावर प्रतिक्रिया. प्रयत्न वाझेने पण केले होते. बंगला शोधण्याचे? खाली जिलेटिनवाली गाडी उभी करण्याचे. तोच वाझे जो लादेन नाही, असे निर्भिड मत उद्धवजींनी व्यक्त केले होते’. असं ट्वीट भातखळकर यांनी केलं आहे.

हेही वाचा-

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

काल (१७ स्प्टेंबर) शिवसेना भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक दसरा मेळावा आणि २१ तारखेला होणाऱ्या गटमेळाव्याच्या आयोजनासंदर्भात होती. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी वेदान्त प्रकल्पाबाबत भाष्य केलं. फॉक्सकॉन आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केलेत. पण तो आता गुजरातला गेल्याने आत्ताचे सरकार आपल्या अपयशाचे खापर जाणिवपूर्वक मविआवर फोडत असल्याचे ठाकरे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *