Headlines

टीम इंडियाच्या खेळाडूंवर IPL खेळण्याची बंदी? वर्ल्डकपसाठी BCCI चा मोठा निर्णय

[ad_1]

Team India players : टीम इंडिया (Team India) चं 2023 साठीचं शेड्यूल (Team India 2023 Schedule) जाहीर करण्यात आलं आहे. टीम इंडियाला यंदाच्या वर्षी 50 पेक्षा अधिक सामने खेळायचे आहेत. याशिवाय भारतीय खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023), वनडे वर्ल्डकप (ODI World cup) यांच्यासारखे महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. अशातच खेळाडूंवरचा कार्यभार कमी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंसंदर्भात एक मोठं पाऊल उचललं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने एनसीएला आयपीएलच्या टीम्ससोबत वर्कलोड मॅनेजमेंटवर काम करण्यास सांगितलंय. दरम्यान या निर्णयामुळे अनेक भारतीय खेळाडूंवर आयपीएल 2023 खेळण्यावर बंदी घालण्यात येऊ शकते.

Team India चा कार्यभार कमी करण्यासाठी BCCI ने उचललं मोठं पाऊल

रविवारी 1 जानेवारी म्हणजे आज मुंबईत भारतीय टीमची एक रिव्ह्यू मिटींग आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी 20 सदस्यांची टीम निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बीसीसीआय या खेळाडूंना फीट करण्यासाठी आहे. यामुळेच बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी एनसीएला आयपीएल टीमसोबत खेळाडूंच्या सुरक्षेसाठी वर्कलोड मॅनेजमेंटवर काम करण्यास सांगितलंय.

बीसीसीआयने या बैठकीत सांगितलं की, आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंवर एनसीए लक्ष ठेवणार आहे. NCA ने आयपीएल फ्रेंचाइजीसोबत मिळून काम करावं असं आम्हाला वाटतं.

बीसीसीआयने अळा 20 खेळाडूंची निवड केलीये, जे या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा भाग असणार आहेत. या सर्व खेळाडूंना पुन्हा खेळण्याची संधी दिली जाईल ज्यामुळे वर्ल्डकपसाठी ते पूर्णपणे तयार असतील. बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे, खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाहीये. 

कसं असणार आहे टीम इंडियाचं शेड्यूल

येत्या 3 जानेवारीपासून टीम इंडियाला श्रीलंकेसोबत सिरीज खेळायची आहे. याव्यतिरीक्त या वर्षी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यासोबत खेळायचं आहे. यामध्ये विदेशी दौऱ्यांचा देखील समावेश आहे. जाणून घेऊया 2023 चं शेड्यूल कसं आहे

भारत विरूद्ध श्रीलंका दौरा (जानेवारी)

•    पहिली टी20 – 3 जानेवारी, मुंबई
•    दूसरी टी20 – 5 जानेवारी, पुणे
•    तीसरी टी20 – 7 जानेवारी, राजकोट
•    पहिली वनडे – 10 जानेवारी, गुवाहाटी
•    दूसरी वनडे – 12 जानेवारी, कोलकाता
•    तीसरी वनडे – 15 जानेवारी, तिरुवनंतपुरम

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *