Headlines

bhaskar jadhav reaction after attack on chiplun house spb 94

[ad_1]

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ”काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती”, असे ते म्हणाले. नवी मुंबईत आयोजित ठाकरे गटाच्या ‘तडीपार मोर्चा’त सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – “…तर भास्कर जाधवांनी या गोष्टींची सवय ठेवली पाहिजे”, हल्ल्याच्या घटनेवरून नितेश राणेंचा टोला!

काय म्हणाले भास्कर जाधव?

“गेल्या ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे. मी कधीही सुरक्षा मागितली नाही. मी माझा शेतीचा व्यवसाय करून मी राजकारण करतो. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार माझ्या मुंबईतील आणि गावातील घरी सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री असं काही करतील असं मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावे आणि माझं सुरक्षा कवच काढलं असावं”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *