Headlines

“कटकास्थान आमच्या बापाने शिकवले नाही”; भरत गोगावलेंचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर

[ad_1]

शिवसेना आणि शिंदे गटाच्यावतीने सर्वोच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत २७ जुलैपर्यंत लेखी स्वरुपात आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल, असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर आता भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनाही प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Video: पंजाब पोलीस आणि मुसेवाला प्रकरणातील हल्लेखोरांमध्ये अटारी सीमेजवळ चकमक; गावकऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश

काय म्हणाले भरत गोगावले

जे घडत आहे, ते योग्य होत आहे. आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडली आहे. त्यामुळे हा निकालही आमच्याबाजुने लागेल. आम्ही दोन तृतीयंश असल्याने आम्हाला काही अडचण होईल, असे वाटत नाही. मात्र, न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. त्याप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.

हेही वाचा – “…त्या दिवशी भाजपा बंडखोरांना बाजूला करेल”; शिंदे गटासंदर्भात उद्धव ठाकरेंचं भाकित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोर आमदारांबाबत बोलताना ”शिवसेना सोडयाची असेल तर मर्दासारखील सोडा, कटकास्थान करू नका”, असे म्हटले होते. यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कटकास्थान आमच्या बापाने शिकवलं नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी जयंत पाटलांना दिले आहे. आम्ही ४० लोक आहे. जेंव्हा ४० लोक सत्ताधारी पक्षातून बाहेर पडतात, तेंव्हा जयंत पाटील यांना समजायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *