Headlines

‘बेशरम रंग’ गाण्यावर कमेंट करणं विवेक अग्निहोत्रीला भोवलं, लेकिचे भगव्या बिकनीतले फोटो व्हायरल

[ad_1]

Pathaan Controversy: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण (Deepika Padukone) यांचा बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात अडकला आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यात दीपिका पदूकोणने ‘भगवी बिकनी’ घातल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या वादात ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी उडी घेत पठाण चित्रपटावर वादग्रस्त कमेंट केली होती. यावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता असा एक फोटो समोर आला आहे, ज्यावरुन लोकांनी विवेक अग्निहोत्रीला टार्गेट केलं आहे. 

काय होती विवेक अग्निहोत्रींची कमेंट
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या माध्यमातून बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेवर विवेक अग्निहोत्री यांनी निशाणा साधला होता. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ (Video) ट्विट केला होता. व्हिडिओत दोन भाग आहेत, पहिल्या भागात ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या काही क्लिप्स आहेत, तर दुसऱ्या भागात एक मुलगी गाण्याच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत असून बॉलिवूड चित्रपट (Bollywood Movie) आणि ओटीटीवरच्या (OTT) कंटेटवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे. 

या मुलीने चांगला कंटेट देण्याची विनंती केली आहे. विवेक अग्निनहोत्री यांनी हा व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी म्हटलंय, इशारा: हा व्हिडिओ बॉलिवूडच्या विरोधात आहे. तुम्ही धर्मनिरपेक्ष असाल तर बघू नका. पण विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया नेटिजन्सना रुचली नाही. त्यांनी सोशल मीडियावर विकेक अग्निहोत्री यांना चांगलाच ट्रोल केलं.

विवेक अग्निहोत्री यांच्या लेकीचे फोटो व्हायरल
विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटरवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने तर विवेक अग्निहोत्री यांच्या लेकीचे भगव्या बिकनीतील फोटो व्हायरल केले आहेत. तसंच त्यांच्या काही वादग्रस्त चित्रपटाचे व्हिडिओ व्हायरल करत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोत विवेक अग्निहोत्री यांची मुलगी मल्लिका एका समुद्रकिनारी भगव्या बिकनीत फोटो सेशन करताना दिसत आहे. 

हा फोटो शेअर करत युजर्सने प्रश्न उपस्थित केला आहे. विवेक अग्निहोत्री यांना अभिनेत्रींच्या बिकनीवाल्या फोटोंवर आक्षेप आहे, पण इथे बघा त्यांचीच मुलगी बिकनीत फोटो टाकतेय. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर मल्लिकाने आपलं अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *