Headlines

महाराष्ट्र युवक काँग्रेसची बार्शी विधानसभा निवडणूक जाहीर , तालुकाध्यक्ष पदासाठी राकेश नवगिरे यांचे नाव आघाडीवर

बार्शी / प्रतिनिधी– महाराष्ट्रात युवक काँग्रेसची निवडणूक जाहीर झाली असून, १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या दरम्यान सदस्य नोंदणी व मतदान होणार असून ऑनलाईन पद्धतीने मतदान होणार आहे, सध्या बार्शी तालुक्यातून 3 जणांनी युवक कॉंग्रेस बार्शी विधानसभा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असून राकेश नवगिरे, निखिल मस्के, अक्षय कोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राकेश नवगिरे यांनी बार्शीतील राजकारणात आपली वेगळी छबी निर्माण केली असून, काँग्रेसचे विचार अनेकांपर्यंत पोचविण्याचे काम ते करत आहेत, बार्शीतील दूषित पाण्याचा प्रश्न व अनियमित पाण्याचा प्रश्न राकेश नवगिरे यांनी सोडविला आहे तसेच अनेक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवितात, सद्या संपूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या निवडणूका लागल्या असून राकेश नवगिरे यांनी बार्शी तालुका विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला असून संपूर्ण बार्शी तालुक्यातून राकेश नवगिरे यांचे नाव आघाडीवर आहे व येणाऱ्या बार्शी नगरपालिका निवडणुकीसाठी ही सोलापूर रोड येथून त्यांचे नाव चर्चेत आहे, 27 ऑक्टोबर ला सोलापूर काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष मा.धवलसिंह मोहिते पाटील यांचा बार्शी दौरा झाला असून या दौऱ्यामध्ये राकेश नवगिरे यांनी त्यांच्या कामाचा कार्य अहवाल त्यांना दिला आहे, राकेश नवगिरे यांच्या रूपाने बार्शी तालुका युवक कॉंग्रेस ला एक प्रामाणिक काम करणारा चेहरा मिळेल अशी सर्वत्र चर्चा चालू आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *