Headlines

‘बाळुच्या अवस्थांतराची डायरी’ला मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार

[ad_1]

नवी दिल्ली, 31  : किरण गुरव लिखित ‘बाळुच्या अवस्थांतराची डायरी’ या लघुकथा संग्रहाला साहित्य अकादमीचा सर्वोत्तम मराठी कलाकृतीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. संजय वाघ लिखित ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीस मराठीतील सर्वोत्तम बालसाहित्याचा तर प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीसाठी मराठीभाषेकरिता युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीने गुरुवारी वर्ष 2021च्या मुख्य पुरस्कारासह, युवा आणि बाल साहित्य  पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट साहित्यिककृतींची निवडक करून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

वर्ष २०२१ करिता प्रत्येक भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीकरिता देण्यात येणारा व साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार म्हणून ओळख असणाऱ्या पुरस्कारासाठी देशातील २० प्रादेशिक भाषांमधील ७ काव्य संग्रह, २ कादंबरी, ५ लघुकथा संग्रह आणि २ नाटक तसेच प्रत्येकी एक आत्मचरित्र,आत्मकथा,समिक्षा ग्रंथ आणि महाकाव्याची निवड करण्यात आली. मराठी भाषेतील सर्वोत्तम कलाकृतीचा म्हणून प्रसिध्द लेखक किरण गुरव यांच्या ‘बाळुच्या अवस्थांतराची डायरी’ या लघुकथा संग्रहाची निवड करण्यात आली.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

मराठी भाषेतील साहित्यिककृती निवड प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षक मंडळात सतिश आळेकर, वसंत पाटणकर आणि डॉ. रविंद्र शोभणे या साहित्यिकांचा समावेश होता.  १ लाख रुपये,सन्मानपत्र, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १ जानेवारी  २०१५ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला.

 ‘जोकर बनला किंगमेकर’ कादंबरी; मराठीतील सर्वोत्तम बालसाहित्य

देशातील २२ प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्तम बालसाहित्याची निवड करण्यात आली यात संजय वाघ लिखित ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीची मराठीभाषेतील सर्वोत्तम बालसाहित्य म्हणून निवड करण्यात आली.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

मराठी भाषेतील बालसाहित्यकृती निवड प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षक मंडळात माधुरी पुरंदरे, श्रीकांत देशमुख आणि डॉ. विश्वास पाटील या साहित्यिकांचा समावेश होता. ५० हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ कादंबरीसाठी युवा पुरस्कार

देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमीच्या वर्ष २०२१च्या युवा पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली.  युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.                                   

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

इंद्रजीत भालेराव,नागनाथ कोत्तापल्ले आणि भास्कर चंदनशिव या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कोकणी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार

मराठी सोबतच प्रसिध्द लेखक संजिव वेर्णेकर लिखित ‘रक्तचंदन’ या काव्यसंग्रहास कोकणी  भाषेतील  सर्वोत्त साहित्यकृतीचा पुरस्कार तर लेखिका सुमेधा कामत-देसाई  लिखित ‘सुमीचे कोतांग्री’ या लघु कादंबरीस सर्वोत्तम बालसाहित्याचा आणि ‘काव्य परमल’ या काव्य संग्रहासाठी श्रध्दा गरड यांना युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘थिंग्ज टू लिव्ह बिहाईंड’ या कादंबरीकरिता नमीता गोखले यांना इंग्रजी भाषेतील सर्वोत्तम कलाकृतीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीने घोषित केलेल्या या तीनही पुरस्कारांचे वितरण साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

‍ि                                                          00000

रितेश भुयार /वि.वृ.क्र. 263 /दि. 31.12.2021  

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *