Headlines

balasaheb thackrey daughter in law visited cm eknath shinde bunglow Varsha for ganesh darshan

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर विराजमान गणपती बाप्पांचे स्मिता ठाकरे यांनी दर्शन घेतले. स्मिता ठाकरे या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेसह कुटुंबीय स्मिता ठाकरे यांच्या भेटीदरम्यान उपस्थित होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट नाकारली; तुरुंग प्रशासनाने म्हटलं, “त्यांना भेटायचं असेल तर…”

एकनाश शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर जुलै महिन्यात स्मिता ठाकरे यांनी शिंदेंची भेट घेतली होती. त्या भेटीवरुन अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावरील या भेटीनंतर दिले होते. करोनानंतर पहिल्यांदाच यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. नेतेमंडळींमध्येही याबाबत कमालीचा उत्साह आहे. राजकीय मतभेद विसरून नेते बाप्पा चरणी नतमस्तक झाले आहेत.

कोण आहेत स्मिता ठाकरे?

स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. एकेकाळी त्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध असलेल्या नाराजीमुळे त्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. जेव्हा शिवसेनेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती, त्यावेळी स्मिता ठाकरे यांचे नावही पक्षप्रमुख पदासाठी समोर आले होते. दरम्यान, स्मिता ठाकरे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नव्हती. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून जायचे होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी भारतकुमार राऊत यांना राज्यसभेवर पाठवल्याने तसेच शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व वाढत गेल्याने नाराज झालेल्या स्मिता ठाकरे यांनी राजकारणाला रामराम ठोकला. सध्या त्या एक एनजीओ चालवतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *