Headlines

balasaheb s shiv sena won 8 gram panchayat elections in dapoli assembly constituency zws 70

[ad_1]

दापोली  : दापोली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट अर्थात बाळासाहेबांची शिवसेना वरचढ ठरली आहे. येथील दहापैकी आठ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी आपला करिश्मा कायम असल्याचे सिद्ध केले आहे.

दापोलीत चारपैकी दोन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध आल्या होत्या. यामध्ये फणसू आणि नवशीचा समावेश होता. या दोन्हींवर बाळासाहेबांची शिवसेनाचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोन ग्रामपंचायत निवडणुकांच्या आज झालेल्या मतमोजणीत गावतळे ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना, तर इनामपांगारीमध्ये गाव पॅनेल यशस्वी झाले. 

मंडणगड तालुक्यातील निगडी आणि घराडी दोन्ही ग्रामपंचायतींवरही ढालतलवारीचाच भगवा फडकला. यामध्ये फक्त घराडीमध्ये मविआने योगेश कदम समर्थकांसाठी चुरस निर्माण केल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, दापोली मतदारसंघात येणाऱ्या खेड तालुक्यामधील चारपैकी नांदगाव, असगणी, देवघर सोंडे ग्रामपंचायतीतही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवाच फडकला. येथील फक्त एकमेव सुसेरी ग्रामपंचायतीवर गाव पॅनल सरस ठरले.

मुळात कोणत्याही पक्षाचे यश ग्रामपंचायत निवडणुकीतूनच सुरू होते. साहजिकच नव्याने स्थापन झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे या गटांना आपली ताकद दाखवणे गरजेचे होते. दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी यामध्ये सर्व विरोधकांवर मात दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या विरोधात असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी हे राजकीय प्रभावामध्ये मावळतीकडे असले तरी त्यांच्या जोडीला माजी खासदार अनंत गीते हेदेखील होते, हे ठाकरे गटाचे नेतृत्व करत होते. आजच्या निकालाने मात्र या दोन्ही दिग्गज नेत्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दापोलीचा बालेकिल्ला राखणे अवघड असल्याचे संकेत मिळू लागले आहे.

दापोली तालुक्यातील फणसू ग्रामपंचायतीत सरपंचपदी रेखा प्रफुल्ल खोपटकर, तर सदस्यपदी स्नेहा संतोष खळे, रोशनी रवींद्र कातकर, दिनेश खळे, अंकिता सुर्वे, अंजली अशोक विचले, अजय लक्ष्मण कदम, राजेश पांडुरंग राऊत, कस्तुरी केतन निकम, किशोर कृष्णा शिगवण यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवसे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी शोएब कलामुद्दीन मुजावर तर सदस्य म्हणून नाजीमा नाजुददीन नाखवा, जायदा मजीदखान बंदरी, अल्फिया मुजम्मील नाखवा, फातिमा महामुद कलदाने, मुश्ताक हसन मुजावर, आफरीन तजमुल नाखवा, शब्बीर खान पठाण हे निवडून आले.

 गावतळे ग्रामपंचायतीत निवडून आलेल्यांमध्ये सरपंच विधी विनोद पवार, सदस्य अक्षता अरुण पवार, उज्ज्वला उत्तम पवार, प्रणव चंद्रकांत पवार, कविता पांडुरंग पवार, राम राजाराम पवार, रिया राकेश म्हाब्दी, नामदेव यशवंत पवार यांचा समावेश आहे.

इनामपांगारी ग्रामपंचायतीत निवडून आलेल्यांमध्ये सरपंच अमित अशोक तांबे, सदस्य वैभवी विनोद निवळकर, विकास विष्णू निवळकर, सुचिता संतोष देवघरकर, राजश्री राजाराम नागले, अनंत भिकाजी महाडिक, किरण चंद्रकांत गमरे, गुलशन इल्यास नांदगावकर यांचा समावेश आहे.

खेड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीत सरपंच महेश भागोजी पालकर, तर सदस्य म्हणून आरिफ सय्यद अहमद कादिरी, सुरैय्या सय्यद मुस्तफा कादिरी, संपदा सुरेश पवार, मनोज मधुकर दिवाळे, सुनील सुरेश पवार, संपदा सुरेश पवार, देविका देवेंद्र जाधव, रिया राकेश बहुतुले, संतोष कृष्णा माळी हे निवडून आले. असगणी ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्यांमध्ये सरपंच संजना संजय बुरटे, सदस्य रिया सचिन बाईत, मेघना भाऊ नायनाक, चंद्रकांत राजाराम गोसावी, प्रमोद पांडुरंग चांदीवडे, सिया सूरज मोहिते, सुिवद्र रामचंद्र धाडवे, शाहीन इस्माईल काद्री, हाजीरा शौकत नेवरेकर, यासीन फकीर घारे यांचा समावेश आहे. देवघर सोंडे ग्रामपंचायतीत सरपंचपदी सुनील बाबूराव मोरे, तर सदस्यपदी पुष्पा सुरेश मोरे, कांचन निवृत्ती मोरे, किरण कृष्णा मोरे, स्नेहल सुरेंद्र मोरे, नामदेव राजाराम सोंडकर, रवींद्र दत्ताराम इंगळे, दीपाली दिलीप मोरे हे विजयी झाले. सुसेरी ग्रामपंचायतीत सरपंचपदी संतोष सीताराम कंचावडे आणि सदस्यपदी सुनील दत्ताराम तटकरी, अश्विनी मधुकर शिंदे, मंगेश वसंत जाधव, वैष्णवी सुसविरकर, सनी संजय शिंदे, अरिवद राजाराम शिर्के, स्वाती सुधीर वैराग, आकांक्षा प्रदीप सावंत निवडून आले आहेत.

मंडणगड तालुक्यातील घराडी ग्रामपंचायतीत सरपंचपदी सुलभा प्रमोद चव्हाण, सदस्यपदी अनिषा अनिल फणसे, मयूरी मिलिंद मोरे, गणेश धनराज बारस्कर, दशरथ मधुकर साळुंखे, दर्शना दगडू साळुंखे, सुशील महादेव बजीरकर, सविता संतोष बैकर, माधवी महादेव सुखदरे, प्रज्ञा प्रकाश जाधव निवडून आले आहेत. निगडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून सईदा मुराद कोंडेकर तर सदस्यपदी अनिता अनिल साखरे, सचिन यशवंत सावंत, अस्मा सुऐब चिपोलकर, अशोक अर्जुन पवार, गजाला नजिर कोंडकर, संजना संदेश साखरे, कामरुन्निसा महमूद ओंबीलकर, रुपेश गजानन निगुडकर हे विजयी झाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *