Headlines

बाप तर बाप मुलाशीही Romance, बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींचा स्वॅगच निराळा

[ad_1]

Bollywood Actresses : बॉलिवूडमध्ये काम करणे जितकं सोपं वाटते तितकेच अवघड आहे. स्वत:चा ठसा उमटवण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळी मेहनत घ्यावी लागते. अनेक अभिनेत्रींना त्यांच्या मनाविरुद्ध काम करावे लागते. कारण प्रत्येकालाच सगळ्यांना मागे टाकत यशाचे शिखर गाठायचे असते. त्यांना दिग्दर्शकाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करावे लागते हे विसरुन चालणार नाही. त्यांच्याजवळ असलेलं अभिनयाचे कौशल्य आणि टॅलेंट पावलोपावली दाखवत स्वत:ला सिद्ध करायचे असते. आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी केवळ नामवंत कलाकारांसोबतच रोमान्स केला नाही तर त्यांच्या मुलांसोबतही रोमान्स केला. चला जाणून घेऊया (famous bollywood actresses Romance between father and son swag of actresses is unique nz)

1. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर (Rishi kapoor) आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूरसोबत (Ranbir kapoor) रोमान्स केला आहे. माधुरी दीक्षित याराना, प्रेम ग्रंथ सारख्या चित्रपटात ऋषी कपूर सोबत दिसली होती, तर तिने ‘ये जवानी है दिवानी’ (Ye jawani hai Diwani)  चित्रपटातील घाघरा गाण्यात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला होता. याशिवाय माधुरी दीक्षितने सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) आणि त्यांचा मुलगा अक्षय खन्ना (Akshay khanna) यांच्यासोबतही रोमान्स (Romance) केला आहे.

2. डिंपल कपाडिया (Dimple Kapadia)

प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने 1991 साली प्रदर्शित झालेल्या दुश्मन देवता या चित्रपटात धर्मेंद्रसोबत (Dharmendra) किसिंग सीन दिला होता. ती धर्मेंद्रसोबत मस्त कलंदर या चित्रपटातही दिसली होती. याशिवाय डिंपल कपाडियाने धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलसोबत (Sunny Deol) मंझिल या चित्रपटातही काम केले होते.

 

हे ही वाचा – काय होतीस तू, काय झालीस…! या स्टारकिड्सचा फोटो पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

3. श्रीदेवी (Sridevi)

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या चित्रपटात धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल यांच्यासोबत रोमान्स (romance) करताना दिसली होती. तिने 1989 मध्ये रिलीज झालेल्या ‘चालबाज’मध्ये सनी देओलसोबत रोमँटिक सीन दिले होते, तर 1990 मध्ये रिलीज झालेल्या ‘नाकाबंदी’ या चित्रपटात ती धर्मेंद्रसोबत दिसली होती. 

4. अमृता सिंग (Amrita Singh)

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगने सनी देओलसोबत (Sunny Deol) बेताब या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ज्यामध्ये तिने अभिनेत्यासोबत अनेक रोमँटिक सीन्स दिले. याशिवाय त्याने सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांच्यासोबत ‘सच्ची की ताकत’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात ती धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

 

हे ही वाचा – ‘या’ अभिनेत्रींना अक्षयसोबत काम करायची वाटते भीती, कारण वाचून बसेल धक्का

5. राणी मुखर्जी (Rani Mukerji)

राणी मुखर्जी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असून ती अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत ब्लॅक चित्रपटात दिसली होती.या चित्रपटात दोघांमध्ये रोमान्स दाखवण्यात आला होता. बस इतना सा ख्वाब है, बंटी और बबली, कभी अलविदा ना कहना यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत रोमँटिक सीन्स दिले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *