Headlines

Avadhoot broke Shiv Bandhan conflict Shiv Sena Uddhav Thackeray ysh 95

[ad_1]

हर्षद कशाळकर

अलिबाग : महाआघाडीच्या स्थापनेमुळे पक्षात झालेली कोंडी आणि शिंदे गटाच्या उठावानंतर जिल्ह्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची झालेली वाताहत, यामुळे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडून भाजपत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसला. त्यामुळे दक्षिण रायगडात पक्षाची मोट बांधून ठेवेल असे एकही नेतृत्व त्यांच्याकडे राहिलेले नाही.

   २०१४ मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर मात्र तटकरे कुटुंबातील गृहकलह उफाळून आल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१९ साली पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी सोपविली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते नाराज होते. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या स्थापनेमुळे अवधूत यांची पक्षात चांगलीच कोंडी झाली होती. ज्या गृहकलहामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसशी महाविकास आघाडीमुळे जुळवून घेण्याचे धोरण पक्षाने अवलंबले होते. त्यामुळे अवधूत यांचा शिवसेनेत कोंडमारा होत होता.

     त्यामुळे गेली चार वर्षे शिवसेनेत असूनही अवधूत तटकरे विजनवासात होते. सक्रिय राजकारणापासून त्यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता.  जिल्ह्यात शिंदे गटाच्या उठावानंतर रायगड जिल्ह्यातील तीनही शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या सोबत गेले होते. त्यामुळे जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला उतरती कळा लागली होती. त्यामुळे पक्षात राहून काहीच हाती लागत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिंदे गटात सहभागी होणे अथवा भाजपत जाणे असे दोन पर्याय अवधूत यांच्यासमोर होते. त्यापैकी भाजपचा पर्याय अवधूत यांनी निवडला.

   दक्षिण रायगडात भाजपला एका चांगल्या नेतृत्वाची गरज होती. पक्षसंघटना वाढीसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्नही सुरू होते. पण नेतृत्व नसल्याने अपेक्षित यश मिळत नव्हते. अवधूत तटकरे यांच्या पक्षप्रवेशामुळे ती पोकळी भरून निघेल, असा विश्वास वाटतो आहे. पण गेली चार वर्षे विजनवासात असलेल्या अवधूत यांना त्यांचे अनेक सहकारी सोडून गेले आहेत. अशा वेळी सोडून गेलेल्या सहकाऱ्यांची नव्याने मोट बांधणे आणि भाजपच्या संघटनात्मक प्रक्रियेशी जुळवून घेणे या दोन पातळय़ांवर अवधूत यांना आगामी काळात काम करावे लागणार आहे.

   ‘पक्षप्रवेशाचा निर्णय घेताना माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी माझा प्रयत्न असेल.’

   –  अवधूत तटकरे, माजी आमदार



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *