Headlines

ऑस्ट्रेलिया T20 World Cup जिंकणार! ‘या’ खेळाडूमुळे पलटणार डाव

[ad_1]

Pat Cummins ODI Captain : T-20 विश्वचषक 2022 सामना सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन (Australian) संघात मोठा बदल झाला आहे. मात्र हा बदल वनडे फॉरमॅटसाठी (ODI format) करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात अॅरॉन फिंचने (Aaron Finch) वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने वनडे फॉरमॅटसाठी संघाच्या नवीन कर्णधाराची नियुक्ती केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आता ऑस्ट्रेलियन वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. (Pat Cummins to replace Aaron Finch as Australia’s ODI captain)

कर्णधारपदासोबतच एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) जिंकण्याची जबाबदारीही पॅट कमिन्सच्या खांद्यावर असेल. पॅट कमिन्स (Pat Cummins) आधीच ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत आहेत. मायदेशात सुरू होणाऱ्या T20  विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय (Australia’s ODI against England) मालिकाही खेळायची आहे. ही देखील होम सीरिज राहील. या मालिकेतून 29 वर्षीय पॅट कमिन्स वनडे फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाचा पदार्पण करताना दिसणार आहे. तर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये ऍरॉन फिंच (Aaron Finch) ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.

कमिन्स गेल्या महिन्यात निवृत्त 

दरम्यान याआधी ऑस्ट्रेलियन वनडे संघाचे कर्णधारपदही आरोन फिंच सांभाळत होते. मात्र गेल्या महिन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यामुळेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला वनडे फॉरमॅटसाठी संघाचा नवा कर्णधार नियुक्त करावा लागला. या चर्चेनंतर बोर्डाने पॅट कमिन्सकडे  (Pat Cummins) कमान सोपवली. फिंचने आपला 146 वा आणि शेवटचा वनडे सामना न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) केर्न्स येथे खेळला. मात्र, फिंच T20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

वॉर्नर आणि स्मिथही कर्णधारपदासाठी वादात होते

फिंचच्या निवृत्तीनंतर चाहत्यांना वाटले की, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) किंवा डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्याकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते. दोघेही ज्येष्ठ आहेत. मात्र असे काही झाले नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली म्हणाले, ‘पॅट कमिन्सने कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.’

वाचा : T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार…; ‘या’ 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता

आयपीएल स्टार पॅट कमिन्स

पॅट कमिन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येही आपली धार दाखवली आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे. कमिन्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये 42 सामने खेळले असून 42 विकेट्स घेतले आहेत. कमिन्स गेल्या सामन्यात फक्त केकेआरकडून खेळला. मात्र दुखापतीमुळे तो या सामन्यातून बाहेर पडला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *