Headlines

अट्रोसिटी प्रकरणातील अटक आरोपीस जामीन मंजूर

बार्शी – श्रीपत पिंपरी ता. बार्शी येथे झालेल्या भांडणावरून बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले गुन्हा रजिस्टर नंबर 13/2022 हा अट्रोसिटी कायद्या अंतर्गत दाखल झाला होता.

यातील मुख्य आरोपी फिरोज आतार यास उपविभागीय पोलिस अधिकारी बार्शी यांनी दि.10/4/2022 रोजी अटक केली होती.

आरोपीने बार्शी येथील सत्र न्यायालयात अँड.रियाज शेख बार्शी यांचे मार्फ़त जामिनासाठी अर्ज केला होता. सदर जामीन अर्जास मूळ फिर्यादी व सरकारी अभियोक्ता यांनी जोरदार विरोध केला होता. आरोपीचे वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. सत्र न्यायालय बार्शी श्री. जगदाळे यांनी आरोपीस अटी व शर्ती सह दि.13/06/2022 रोजी जामीन मंजूर केला.

यात आरोपी तर्फे अँड.रियाज शेख व सरकारी पक्षा तर्फे श्री.प्रदिप बोचरे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *