Headlines

वर्षानुवर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असूनही ‘या’ स्टार्सना व्हावं लागलं दुसऱ्यांसोबत सेटल

[ad_1]

मुंबई : बॉलीवूडच्या दुनियेत कोण कोणाच्या प्रेमात आहे हे लपून राहू शकत नाही आणि जर हे कपल एकत्र राहू लागलं म्हणजेच लिव्ह इनमध्ये तर ही चोरी लवकरच पकडली जाते. आज आम्‍ही तुम्‍हाला बॉलीवूडच्‍या अश्या कपलबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्‍या प्रेमाची चर्चा तर खूप होती. पण ते दुस-यासोबत सेटल झाले.

सुशांत-अंकिता 
सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे टीव्ही शो ‘पवित्र रिश्ता’मधून एकमेकांच्या जवळ आले. सुशांत फिल्मी दुनियेकडे वळताच अंकितासोबतच्या रिलेशनशिपमध्ये अंतर वाढू लागलं. 2020 मध्ये सुशांतचा मृत्यू झाला. तर अंकिताने नुकतंच तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं.

लारा दत्ता-केली डोर्जी
बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने भूटानी एक्टर केली डोर्जीला खूप दिवस डेट केलं होतं. बरेच दिवस दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही उडू लागल्या. पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं आणि लारा दत्ताने महेश भूपतीशी लग्न करून सेटल झाले.

रणबीर-कतरिना
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल होतं. या कपलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते. पण कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघंही वेगळे झाले. कतरिनाने विकीसोबत सात फेरे घेतले. तर रणबीरही आलियासोबत सेटल झाला.

जॉन-बिपाशा  
बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम यांना एकेकाळी बॉलिवूडचे हॉट कपल म्हटलं जायचं. लोकं या जोडप्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे कपल नऊ वर्षांहून अधिक काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतं. पुढे जॉन अब्राहमने प्रिया रुंचालशी लग्न केले, तर बिपाशा बसूनेही करण सिंग ग्रोव्हरला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले.

शाहिद-प्रियांका
 प्रियांका चोप्रा लग्नाआधी अनेकदा तिच्या अफेअरमुळे चर्चेत होती. तिचं नाव शाहिद कपूरसोबतही जोडलं गेलं होतं आणि दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात असा अंदाज वर्तवला जात होता. जेव्हा प्रियांकाच्या घरावर आयकरने छापा टाकला तेव्हा हा प्रकार उघड झाला कारण शाहिद तिथे उपस्थित होता. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. प्रियांकाने सातासमुद्रापार तिचा साथीदार निवडला. तर शाहिद कपूरने अरेंज मॅरेज केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *