Headlines

Jyotish Shastra: गाडीमध्ये चुकूनही ‘या’ गोष्टी ठेवून नका, अन्यथा…

[ad_1]

Jyotish Shastra For Cars: भारतातील मोठी लोकसंख्या ज्योतिषावर विश्वास ठेवते आणि ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) कोणतेही महत्त्वाचे काम करते. साधारणत: जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करायला जाते तेव्हा ज्योतिष शास्त्राचा विचार घेतला जातो. यामध्ये काही अपवाद असतात जे ज्योतिषशास्त्रांवर विश्वास ठेवत नाही. परंतु मोठ्या संख्येने लोक ज्योतिषशास्त्रानुसार ठरलेल्या दिवशी आणि वेळेनुसार कार खरेदी करतात. अशा परिस्थितीत जर तुमचाही ज्योतिषावर विश्वास असेल तर आज आम्ही तुम्हाला कार आणि ज्योतिष शास्त्राशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. यामध्ये कारमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होऊ शकतो. 

तर दुसरीकडे प्रत्येकाला असं वाटतं की, त्यांची कार कितीही वर्ष झाली तरी नव्यासारखी दिसावी. यासाठी लोक आपली कार घासून पुसुन साफ ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुमची कार आतून स्वच्छ नसेल तर केबिनमध्ये दुर्गंध पसरेल. कारमधून दुर्गंधी सुटली तर त्यामध्ये बसायला कोणालाच आवडणार नाही.  

वाचा : आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match? 

या गोष्टी कारमध्ये ठेवू नका 

सहसा गाडीची ट्रंक खूप मोठी असते आणि त्यात बरेच सामान राहते. त्यामुळे अनेक वेळा लोक अनावश्यक गोष्टी गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवतात. पण, ज्योतिष शास्त्रानुसार गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवलेल्या अनावश्यक गोष्टी हानिकारक आणि अशुभ ठरू शकतात.  यामुळे शनिदेव क्रोधित होतात, ज्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीवर नकारात्मक प्रभाव देखील पडू शकतोय. अशा वेळी तुमच्या  कारमध्ये ट्रंकमध्ये कचरा, जुनी बिले, अनावश्यक कागदपत्रे, खराब बाटल्या इत्यादी पडल्या असतील तर त्या ताबडतोब बाहेर काढून टाका. गाडीची ट्रंक स्वच्छ असावी हे लक्षात ठेवा. त्यात फक्त स्टेपनी आणि टूल किट सारख्या आवश्यक गोष्टी ठेवल्या पाहिजेत.

कारमध्ये स्वच्छता ठेवा

माँ लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. असे म्हणतात की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते, त्याच्या आयुष्यात पैशांसह कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. पण, तुम्ही ऐकले असेल की मां लक्ष्मीला घाण आवडत नाही आणि ती घाणीत राहत नाही. म्हणूनच, लोकांना घर स्वच्छ ठेवण्यास सांगितले जाते. हीच गोष्ट कार मध्ये ही लागू होते. कारमध्ये नेहमी स्वच्छता असावी, तरच लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. अन्यथा, तुम्ही कितीही पैसे कमावले तरी ते तुमच्याकडे राहणार नाही, उलट ते खर्च होईल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *