Headlines

Asia Cup 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान आमनेसामने येणार! जाणून घ्या समीकरण

[ad_1]

Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धा रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. सुपर 4 फेरीतील दोन संघ अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित करणार आहे. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघाला प्रत्येकी 3 सामने खेळायचे आहे. सुपर 4 फेरीत भारताला पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं पराभूत केलं. दुसरीकडे, भारताला अजूनही श्रीलंका आणि अफगाणिस्तानशी लढत करायची आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही सामने जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियापुढे कसं समीकरण असेल, जाणून घेऊयात.

-भारताचा सुपर 4 फेरीतील दुसरा सामना 6 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि तिसरा सामना 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर अंतिम फेरीत स्थान निश्चित असेल.

-श्रीलंकेने पहिल्या साम्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. अशात भारताकडून पराभव आणि पाकिस्तान विरुद्ध जिंकला. तर श्रीलंकचे 4-4 अंक होतील. या दरम्यान अफगाणिस्ताननं पाकिस्तानला पराभूत केलं, तर भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही संघाचे प्रत्येकी 4 गुण होतील. त्यामुळे टॉप-2 संघाचा निर्णय रनरेटवर असेल.

-भारत आणि पाकिस्तान यांनी उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर अंतिम फेरीत स्थान निश्चित होईल. अशा स्थितीत पाकिस्तानचे 6, भारताचे 4 गुण, श्रीलंकेचे 2 आणि अफगाणिस्तानला भोपळाही फोडता येणार नाही.

-पाकिस्तानच्या संघाने उर्वरित सामन्यांमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानला पराभूत केले तर अंतिम फेरीत पोहोचेल. दुसरीकडे, जर भारतीय संघ श्रीलंकेतून जिंकला आणि अफगाणिस्तानकडून पराभूत झाला, तर तिन्ही संघांचे 2-2 गुण होतील. अशा स्थितीत पुन्हा एकदा रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे श्रीलंकेने 5 तर पाकिस्तानने 2 वेळा विजय मिळवला आहे. या स्पर्धेचं 15वं पर्व सुरु आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *