Headlines

“तो हिरो आणि मी साईडला असे…”, Ravindra Mahajani यांच्या निधनावर बोलताना अशोक सराफ भावूक

[ad_1]

Ashok Saraf on Actor Ravindra Mahajani Death : मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं अकाली निधन झालं आहे. त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी ते मृतावस्थेत सापडले. रवींद्र महाजनी यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली हे पाहता शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं होतं. त्यानंतर पोलिसांना दरवाजा तोडून पाहिलं तर रवींद्र महाजनी हे मृतावस्थेत सापडले. काही महिन्यांपासून रवींद्र या घरी भाड्यानं राहत होते. दरम्यान, रवींद्र यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या निधनावर बोलत जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अशोक सराफ यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रवींद्र महाजनी यांच्या निधनावर त्यांच्या भावना व्यक्त करत म्हणाले, “खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केलेत. आम्ही यशस्वी चित्रपट केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होतंय. एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम करायचा. जे करायचा ते मन लावून करायचा, त्यामुळे तो त्या काळातला एक यशस्वी नट होता” .

रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी हा त्याच्या कुटुंबासोबत मुंबईत राहत होतो. त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूविषयी कळतात तो त्वरित पुण्याच्या दिशेनं निघाला. आज रवींद्र महाजनी यांच्या मृतदेहाचं शविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थीवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येईल. 

हेही वाचा : Ravindra Mahajani : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या आठ महिन्यांपासून ते आंबी या ठिकाणी एका भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख मिळाली होती. त्यांनी करिअरच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं. तब्बल तीन वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. ते टॅक्सी चालवतात म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी सगळे संबंध तोडले होते. झुंज या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्यांना देखणा, रुबाबदार, दमदार अशी पर्सनॅलिटी असलेला अभिनेता म्हणून लागले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *