Headlines

‘त्यांनी मला मारलं किंवा खोलित बंद…’, आशिष विद्यार्थी यांच्या पत्नीनं सांगितलं घटस्फोटाचं कारण

[ad_1]

Ashish Vidyarthi’s ex wife Piloo Vidyarthi on Divorce : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्या दोघांचं लग्न हे सगळीकडे चर्चेचा विषय ठरलं होतं. आशिष विद्यार्थी त्यांचं पहिलं लग्न हे अभिनेत्री राजोशी ऊर्फ पिलू विद्यार्थी यांच्याशी झालं होतं. लग्नाच्या 22 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी घटस्फोट का घेतला असेल यावर प्रत्येक व्यक्ती त्याला वाटेल ते बोलू लागले. मात्र, आता पिलू यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विभक्त होण्यावर वक्तव्य केलं आहे. 

पिलू विद्यार्थी यांनी नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत पिलू यांनी विभक्त होण्यावर वक्तव्या केलं आहे. याविषयी बोलताना पिलू विद्यार्थी म्हणाल्या की ‘संपूर्ण जग त्यांच्या लग्नात काय समस्या आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं सांगायचं झालं तर आमच्यात अशा कोणत्याही समस्या नव्हत्या. पण यागोष्टीवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. त्यातही त्यांच्या समोर प्रश्न उपस्थित राहत होते की असं कस शक्य आहे. आमच्यात अजूनही कनेक्शन आणि आपुलकी आहे. फक्त बदलले आहेत ते आमचे मार्ग. जवळपास दीड वर्षे आम्ही यावर विचार करत होतो. कारण आम्हाला आमचं भविष्य हे एकत्र नाही तर वेगळं दिसत होतं. ‘

पुढे त्या म्हणाल्या, ‘अनेकांनी फेसबूकवर कमेंट करत आम्हाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. लोकांची मानसिकता थोडी वेगळी आहे, पण आज मी आनंदी आयुष्य जगते. मी माझं जे काम होतं ते पूर्ण केलं आहे. माझं सासरच्या मंडळींशी खूप चांगलं नातं आहे. ते सगळे माझ्यासोबत खूप चांगल्याप्रकारे बोलतात. कारण आमच्यात कधी समस्याच नव्हती. त्यांनाही ही गोष्ट माहीत आहे की, हे दोघं इतकी वर्षे सोबत होती आणि आता त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. मला लोकांना हे सत्य सांगावं लागतं की मी खरंच आता खुश आहे, स्वतंत्र आहे, मोकळ्या मनाची कलाकार आहे. एक चांगली मुलगी, सून, पत्नी, आई या सर्व भूमिका मी चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. माझ्या मुलासोबतचं चांगलं छान आहे आणि त्यानंही आमचा निर्णय स्वीकारला आहे.’

हेही वाचा : डेझी शहावर होता हत्येचा आरोप; प्रकरण इतकं गंभीर की, सलमानही वाचवू शकला नाही!

पुढे पिलू म्हणाल्या की ‘मी जगभरातील विविध कुटुंबांमध्ये हे पाहिलंय, की महिलांना पत्नीच्या भूमिकेतच कसं खुश राहावं ते शिकवलं जातं. पण त्यात मी खुश नव्हते. एक पत्नी म्हणून माझ्याकडून ज्या पतीच्या अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करू शकत नव्हते. एका टप्प्यानंतर मी ही गोष्ट स्वीकारली होती. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी मला मारलं किंवा खोलित बंद केलं, असं काही झालं नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, त्या प्रमाणे त्यांची मानसिकता देखील वेगळीच अते. कोणीही योग्य किंवा अयोग्य नाही. त्यामुळे मी आता पत्नी म्हणून यापुढे राहू शकत नाही हे कळताच मी त्यांना सांगितले. त्यांनी देखील हे लगेच स्वीकारले, कारण यात कोणाचीही चूक नव्हती. आशीष कधी चित्रपट पाहत नाही, पण त्यांना आनंद आहे की मी काम करते आणि आमचा मुलगा देखील आनंदी आहे’.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *