Headlines

ashish shelar on sandip patil sharad pawar over mca election ssa 97

[ad_1]

मागील महिन्यात झालेली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( एमसीए ) निवडणुकीने राज्याचे लक्ष वेढलं होतं. या निवडणुकीत पवार-शेलार पॅनेल विरुद्ध संदीप पाटील यांच्यात लढत झाली. मात्र, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, पवार-शेलार पॅनेलचे अमोल काळे विजयी झाले होते.

अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना १५८ मतं पडली होती. २५ मतांनी काळेंनी संदीप पाटलांचा पराभव केला होता. पण, ज्या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपले आयुष्य खर्ची केलं. त्यांचा पराभव करून राजकारणी लोक अध्यक्षपदी बसतात, असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आता भाजपा नेते, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा : ‘काँग्रेसचे दोन टप्पे पडतील’ म्हणणाऱ्या आशिष शेलारांना यशोमती ठाकूरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आरएसएस…”

“…तर संदीप पाटील अध्यक्ष झाले असते”

“संदीप पाटील अध्यक्ष झाले पाहिजे होते, यात दुमत नाही. पण, निवडून देण्याचा अधिकार मतदारांना होता. संदीप पाटलांनी एकदाही एकत्र येण्यासाठी साद घातली नाही. एक पाऊल पुढे आले असते, तर पाटील अध्यक्ष झाले असते,” असे शेलार यांनी म्हटलं आहे.

“तेव्हा आम्ही उमेदवार घोषित…”

अध्यक्ष पदासाठी अमोल काळेंना संधी का दिली? यावर शेलार म्हणाले की, “संदीप पाटलांनी सर्वात पहिल्यांदा उमेदवारी घोषित केली. ती एका गटाची का केली. तेव्हा आम्ही उमेदवार घोषित केला नव्हता. त्यानंतर, मी निवडणुकीतून माघार घेतल्यावर पाटील यांनी आवाहन केलं असते, तर अध्यक्षपदासाठी संधी दिली असती. त्याचा पाटील यांनी फायदा घेतला नाही.”

हेही वाचा : शिवसेनेनंतर काँग्रेसमध्येही फूट? आशिष शेलारांच्या विधानामुळे चर्चांना उधाण, म्हणाले “दुसऱ्या टप्प्यात…”

“शरद पवारांबरोबरचे फोटो संदीप पाटीलांनी…”

शरद पवार यांनी संदीप पाटलांना उमेदवार घोषित केलं होतं का? यावरही शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “संदीप पाटलांना पवार गटाने उमेदावारी दिली हा भ्रम शरद पवारांनी स्पष्ट केला. संदीप पाटलांच्या उमेदवारीबद्दल शरद पवार माझ्याशी बोलले नव्हते. शरद पवारांबरोबरचे फोटो संदीप पाटलांनी पसरवले. त्यानंतर पवारांनी मला फोन करून ‘हे काय चाललं आहे, हे कधी ठरलं,’ असे विचारलं. मी त्यावरती काहीचं बोललो नाही. शरद पवार यांनीच त्यावर स्पष्टीकरण द्यावे, असे सांगितल्याचं” शेलार म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *