Headlines

‘त्याचा परिणाम मनस्थितीवर…’, पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत असं का म्हणाला सुबोध भावे?

[ad_1]

Subodh Bhave Kashmir Trip Wife Video : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सुबोधने नाटक, मालिका आणि चित्रपट या सर्वच माध्यमातून विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या सुबोध हा ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ यामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यातच आता सुबोध हा भारताचे नंदनवन काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. पण त्याच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. सुबोध हा सध्या काश्मीरमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो काश्मीरमधील विविध प्रेक्षणीय स्थळांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. यातील एका फोटोत त्याचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. यात सुबोध भावे, पत्नी मंजिरी भावे, कान्हा भावे आणि मल्हार भावे हे चौघेजण दिसत आहेत. 

सुबोध भावेचे कॅप्शन चर्चेत

त्यानंतर सुबोधने इन्स्टाग्रामवर पत्नी मंजिरीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मंजिरी ही गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेत आहे. यात ती बर्फावर गाणी बोलत नाचताना दिसत आहे. तसेच सुबोधही यात गाणे गुणगुणताना दिसत आहे. सुबोधने  हा व्हिडीओ शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शन दिले आहे. “तापमानात घट झाली की त्याचा परिणाम मनस्थितीवर होतो त्याचा हा पुरावा”, असे कॅप्शन सुबोधने दिले आहे. त्यासोबत त्याने हसतानाचे काही इमोजीही शेअर केले आहेत. 

सुबोधच्या या व्हिडीओवर रश्मी अनपट, सुकन्या मोने या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. यावर श्रुती मराठेने “जमतंय जमतंय, रिल्स जमतायत” अशी कमेंट केली आहे. त्यावर सुबोधने “शिकतोय तुमच्या सारख्या गुरूकडून”, असे म्हणत तिला प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सुबोध भावेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दरम्यान सध्या सुबोध भावे हा ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच सुबोध भावेने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या मराठी रिमेकसाठी डबिंगही केले आहे. त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर या भूमिकाला आवाज दिला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *