Headlines

आर्यन नीसाला पळवून घेऊन गेला तर? करणच्या प्रश्नावर काजोलचं उत्तर ऐकूण घाबरला शाहरुख

[ad_1]

Shahrukh Khan and Kajol : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत अशा अनेक ऑनस्क्रिन जोड्या आहेत. ज्या आजही सगळ्यांच्या मनात राज्य करतात. त्यापैकी एक जोडी म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि काजोलची (Kajol) जोडी. या दोघांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या जोडीला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांच्यात असलेला रोमान्स हा प्रेक्षकांना आजही पाहायचा आहे. असंही झालं की अनेकांच्या इच्छा होत्या की हा रोमान्स त्यांच्यात खऱ्या आयुष्यात असता तर किती छान झालं असतं. दरम्यान, आता सगळ्यांच्या नजरा या शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि काजोलची लेक नीसा देवगणनं वेधलं आहे. त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे की त्या दोघांनी एकत्र काम केलं पाहिजे. त्यानंतर त्या दोघांनी रिलेशनशिपमध्ये यायला हवं अशी इच्छा तर करण जोहरची देखील होती. करणनं याचा खुलासा त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या एका एपिसोडमध्ये केला होता. 

करणनं ‘कॉफी विथ करण’ शोच्या एका एपिसोडमध्ये काऊचवर’कुछ कुछ होता है’ ची कास्ट होती. त्यावेळी समोर बसलेल्या शाहरुख आणि काजोलला विचारले की जर एक दिवस आर्यन खान नीसा देवगनला पळवून घेऊन गेला तर? हा रॅपिड फायर राउंड असल्याने  त्यामुळे काजोलने लगेचच मजेशीर उत्तर दिले होते. पण सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे हे सर्व चालू असताना  शाहरुख हसतच राहिला, आपली बोलती बंद झाल्याचे शाहरुखनं मान्य करत त्याच्याकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नसल्याचं सांगितलं.

हा एपिसोड 2007 सालच्या ‘कॉफी विथ करण’ च्या शोचा होता. त्यावेळी करणने काजोलला विचारले की, जर 10 वर्षांनंतर आर्यन तुझी मुलगी नीसासोबत पळून गेला हे तुला कळलं तर तुझी प्रतिक्रिया कशी असेल? काजोल एका सेकंदात म्हणाली, ‘मी म्हणेन… दिलवाले दुल्हे ले जायेंगे.’ त्यानंतर काजोल जोरजोरात हसू लागली. ते पाहून शाहरुखही हसायला लागला. 

हेही वाचा : Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Review : सलमानचा चित्रपट पाहण्याआधी नक्कीच वाचा ‘हा’ रिव्ह्यू

तर शाहरुख म्हणाला, ‘मला या गोष्टीचा विचार करायला देखील भीती वाटते. खरं म्हणजे काजोलसोबत त्यावेळी माझं नातं असेल या विचाराने मला भीती वाटते.’ शाहरुखचे हे मजेदार उत्तर ऐकून राणी, काजोल आणि करणही जोरजोरात हसू लागले. 

शाहरुख आणि काजोलनं ‘बाजीगर’ या चित्रपटात पहिलांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्या दोघांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात काम केलं तर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *