Headlines

Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह पत्नीला सेबीचा मोठा दणका

[ad_1]

Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीवर सेबीने कडक कारवाई केली आहे.अर्शदसह 45 युट्युबर्स शेअर पंप आणि डंप योजनेत दोषी आढळलेत. या सर्वांवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करुन शेअर बाजाराचे नुकसान केल्याचा आरोप आहे. सेबीने अर्शद वारसीसह त्याची पत्नी मारिया आणि त्याचा भाऊ इक्बाल वारसी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बाजारातील व्यवहारांमध्ये भाग घेण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी सेबीने शार्पलाइन तसेच साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या प्रवर्तकांसह 31 संस्थांवर कारवाई केली आहे.

सेबीच्या कारवाईच्या कक्षेत आलेल्या सर्व लोक आणि युनिट्सना 41 लाख 85 हजारांचा नफा झाला असून बाजार नियामकने संपूर्ण नफा जप्त करण्याचे निर्देश दिलेत. या प्रकरणात अर्शद वारसीला 29.43 लाख रुपये तर त्याच्या पत्नीला 37.56 लाखांचा नफा झाल्याचे सेबीने सांगितले आहे.

यूटयुब वाहिनीवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून दोन कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत फेरफार केला आणि यातून आर्थिक लाभ मिळवला असा आरोप अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण 45 जणांवर करण्यात आली आहे. ‘सेबी’ने त्यांना एक वर्षांसाठी  व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे. त्यानुसार, नियामकांनी दोषी 45 जणांना पुढील आदेश दिला जाईपर्यंत कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोखे, समभागांची खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले गेले आहे.

नमकं काय आहे हे प्रकरण?

गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूटय़ूब व्हिडीओ तयार केली आणि ती प्रसारित केली गेली, असा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. 

गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात आली आहे. व्हिडीओमधून, दूरचित्रवाणी वाहिनी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि नवी दिल्लीस्थित प्रसारण क्षेत्रातील कंपनी शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची शिफारस करण्याशी संबंधित हे प्रकरण आहे.

तसेच शेअरच्या किमती वाढवून स्वत:पाशी असलेल्या समभागांची विक्री करुन मोठा आर्थिक लाभ मिळविण्यात आला. असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *