Headlines

Apple Store : अखेर भारतातील पहिलं-वहिलं​ॲपलस्टोर मुंबईत सुरु, जाणून घ्या या स्टोरबद्दलच्या काही खास गोष्टी

[ad_1]

​Apple Retail Store BKC : जगातील सर्वात प्रसिद्ध मोबाईल ब्रँड ॲपलचं बहुचर्चित असं भारतातील पहिलं रिटेल स्टोअर मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आजपासून सुरू झालं आहे. बऱ्याच दिवसांपासून या स्टोरची चर्चा होती, ज्यानंतर आता फायनली ॲपलचे सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत स्टोरचं उद्घाटन झालं. तर ॲपलचं हे मुंबईतील स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारखं भव्य दिसत आहे. त्यामुळे आता भारतात राहणाऱ्या ॲपल लव्हर्सना थेट ॲपल रिटेल स्टोरमधून खरेदी करता येणार आहे. मुंबईशिवाय दिल्लीतही अॅपल स्टोअर हे १०,०००-१०,००० स्क्वेअर फूट मध्ये असेल. दिल्लीचे हे स्टोअर साकेतच्या सिटीवॉक मॉल याठिकाणी असणार आहे. तर तूर्तास मुंबईत उघडलेल्या या पहिल्या वहिल्या भारतातील ॲपल स्टोरबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ…

​भारतातील पहिलं Apple Store

-apple-store

तर मुंबईची बीकेसी येथे खोलण्यात आलेलं हे Apple Store मुंबईतीलच नाही तर भारतातील पहिलं Apple Store आहे. त्यामुळे आता भारतीय ग्राहकांना एक खास असा ग्लोबल अनुभव घेता येणार आहे. जगभरातील Apple Store हे त्यांच्या डिझाइनसाठी ओळखले जातात आणि तेच समोर ठेवून हे स्टोरही बनवण्यात आलं आहे.

​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

खास आहे संपूर्ण डिझाइन

खास आहे संपूर्ण डिझाइन

तर जसंकी ॲपलचे फोन अगदी खास असतात त्यांचा लूक जसा वेगळा असतो तसंच या स्टोरचा लूकही हटके आणि सुंदर आहे. सिलिंगवर १,००० टाइल्स असून प्रत्येक टाइल लाकडाच्या 408 तुकड्यांपासून बनविली गेली आहे. अशारितीने अगदी हटके आणि छान असं हे एक भव्य डिझाइन आहे, जे स्टोअरमध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येकाचंच लक्ष वेधून घेईल. विशेष म्हणजे दोन दगडी भिंती याठिकाणी आहेत.ज्याची दगडं ही राजस्थानमधून आणली आहेत.तसंच स्टेनलेस स्टीलच्या बनलेला पायर्या ही अप्रतिम दिसत आहेत.

​​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

​20 पेक्षा अधिक भाषा बोलू शकणारे कर्मचारी

20-

विशेष म्हणजे या Apple BKC च्या स्टोअरमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि ते एकत्रितपणे 20 वेगवेगळ्या भाषा बोलतात.त्यामुळे या ठिकाणी सर्वप्रकारच्या ग्राहकांना भारी अनुभव मिळेल. तसंच भारतीय ग्राहकांना स्टोअरमध्ये पिकअप, अॅपलच्या तज्ज्ञांशी (Genius) संवाद यासारख्या सेवा मिळतील.

​​वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

​ॲपल ट्रेड इन प्रोग्राम सारख्या सेवा

​ॲपल ट्रेड इन प्रोग्राम सारख्या सेवा

तर जगातील इतर ॲपल स्टोर्समध्ये असणारे खास अशा विविध सुविधा याठिकाणी आहेत. त्यातीलच एक म्हणजे ॲपल ​ट्रेड इन प्रोग्राम. यातंर्गत याठिकाणी खरेदीदार त्यांचे जुने iPhone, Mac, iPad नवीन डिव्हाईस घेण्यासाठी एक्सचेंज करू शकतात. हाच ट्रेड इन प्रोग्राम Apple BKC येथे देखील उपलब्ध आहे.

​​वाचा : ​Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

​“Today at Apple” सत्रांचं आयोज

today-at-apple-

ॲपल उत्पादनं आणि सेवांबद्दल ग्राहकांसाठी विशेष सत्रं
Apple BKC येथे दररोज, कंपनी आयोजित करणार आहे. याला “Today at Apple” सत्र असं म्हटलं जाणार असून याचं आयोजन दररोज केलं जाणार आहे. जे व्यावसायिकांसह Apple कर्मचारी यांच्याद्वारे आयोजित केले जातील. या सत्रांमध्ये कलाकार, छायाचित्रकार आणि इतर सर्जनशील व्यावसायिकांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा देखील घेतल्या जाणार आहेत.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

सर्वप्रकारे खास आहे हे स्टोर

सर्वप्रकारे खास आहे हे स्टोर

या स्टोरमधील एक खास गोष्ट म्हणजे याठिकाणी जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. तसंच या ठिकाणी विविध प्रक्रियांसाठी जीवाश्म इंधनाचा वापर कमी होणार असून स्टोअर कार्बन न्यूट्रल असून 100 टक्के अक्षय ऊर्जेवर चालणार आहे. याशिवाय भारतातील दुसरं ॲपल रिटेल स्टोअर दिल्लीच्या साकेत येथे २० एप्रिल रोजी उघडणार आहे.

​वाचा :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *