Headlines

…अन् ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सुधा मूर्ती सर्वांसमोर ‘टिकली वादा’मुळे चर्चेत असलेल्या संभाजी भिडेंच्या पाया पडल्या | Author Sudha Murthy Bowing Down touch feet of sambhaji bhide scsg 91

[ad_1]

‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांनी सोमवारी सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सुधा मूर्ती यांनी भिडे यांच्या पाया पडल्याचंही दिसून आलं. सध्या संभाजी भिडे हे त्यांच्या टिकलीसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सुधा मूर्ती आणि भिडे यांच्यामध्ये चार ते पाच मिनिटं चर्चा झाली.

एका कार्यक्रमानिमित्त सूधा मूर्ती भावे नाट्यगृहामध्ये आल्या होत्या. त्याचवेळी तिथे संभाजी भिडेही एका कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा नाट्यगृहाच्या आवारामध्ये या दोघांची भेट झाली. संभाजी भिडे भेटल्यानंतर सुधा मूर्ती त्यांच्या पाया पडल्या. त्यानंतर दोघांनाही खुर्च्यांवरुन काही वेळ गप्पा मारल्या. अशाप्रकारे सुधा मूर्ती यांनी एखाद्या व्यक्तीच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही आठवड्यांपूर्वी सुधा मूर्तींचा एका महिलेच्या पाया पडत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुधा मूर्ती या मैसूरच्या राजघराण्यातील सदस्या असलेल्या प्रमोदा देवी वाडियार यांच्या पाया पडत असल्याचा २०१९ चा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत होता.

नक्की वाचा >> ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सुधा मूर्तींच्या या फोटोवरुन निर्माण झाला वाद, जाणून घ्या प्रकरण काय

सुधा मूर्ती यांनी नृसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतलं. त्यानंतर सुधा मूर्ती या त्यांचं बालपण गेलेल्या कुरुंदवाड येथील घरीही गेल्या होत्या. अनेक दशकांनंतर त्यांनी या घराला भेट दिली. त्यांनी यावेळी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. “काहीही असो मी स्वत:ला इथली कन्या मानते. बाहेरची कुठलीही पदवी असू दे पण इथं आल्यावर मला सगळे आपले वाटतात. इथे मी बाहेरची आहे असं मला कधीही वाटत नाही,” असं सुधा मूर्ती यांनी स्थानिकांशी गप्पा मारताना सांगितलं.

दरम्यान, संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगाने पुन्हा एखदा नोटीस पाठवली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवारीच ट्वीटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. “महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा अशी नोटीस आयोगाकडून दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ रोजी बजावण्यात आली होती. यावर अद्याप त्यांच्याकडून खुलासा न आल्याने त्यांना आज पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला विहित मर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे,” असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

बुधवारी (२ नोव्हेंबर रोजी) संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे भिडे यांनी महिला पत्रकाराचा अपमान केल्यावरुन वाद निर्माण झाला. एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. त्यावरुनच आता त्यांना महिला आयोगाने दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *