Headlines

Andheri Bypoll: “पक्षाशी निष्ठावंत असलेले सगळे…” प्रचाराला सुरुवात करताच ऋतुजा लटकेंचं विधान, म्हणाल्या… | andheri east bypoll rutuja latke started election rally ramesh latke rmm 97

[ad_1]

Andheri Bypoll: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर याठिकाणी पोटनिवडणूक पार पडत आहे. रमेश लटके यांच्या जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ही निवडणूक लढवत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत ऋतुजा लटके यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल आहे.

त्यानंतर आजपासून (शनिवार) त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचाराला सुरुवात होताच ऋतुजा लटके यांनी लोक मला बहुमताने निवडून देतील. ३ तारखेला सर्वकाही स्पष्ट होईल, असं विधान त्यांनी केलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा- न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर; शुक्रवारी सकाळीच दिले स्वीकृतीपत्र

यावेळी ऋतुजा लटके म्हणाल्या, “रमेश लटके ज्याप्रमाणे गणपती मंदिराचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करायचे. तशीच सुरुवात आम्ही केली आहे. माझ्या प्रचार सभेला सगळे आपले जुने शिवसैनिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. आजपासून हा प्रचार सुरू होतोय. काल अर्ज दाखल करताना लोकांनी मोठी गर्दी होती. रमेश लटके यांच्याबाबत लोकांचं असलेलं प्रेम आणि निष्ठा माझ्यासोबतही कायम असल्याचं यातून दिसलं.”

हेही वाचा- Andheri Bypoll: सून अर्ज भरायला गेल्यानंतर रमेश लटकेंच्या वडिलांना अश्रू अनावर, भावुक होत म्हणाले…

“पक्षाशी निष्ठावंत असलेले सगळेजण माझ्यासोबत आहेत, हेच आम्हाला ३ तारखेला दाखवून द्यायचं आहे. यासाठी सगळे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. लोक मला बहुमताने निवडून देतील, असा मला विश्वास आहे” असंही ऋतुजा लटके यावेळी म्हणाल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *