Headlines

विद्या बालनच्या दीराला डेट करतेय अनन्या पांडे!

[ad_1]

मुंबई :  पॅचअप, ब्रेकअप… या गोष्टी बॉलिवूडमध्ये सर्रास घडत असतात. कधी कोणाच सुत कोणासोबत जुळेल सांगता येत नाही. कलाकार त्यांच्या कमामुळे कमी, तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत असतात. आता या यादीमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेची देखील एन्ट्री झाली आहे. अनन्या पांडे पूर्वी अभिनेता ईशान खट्टरला डेट करत होती. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण ईशान आणि अनन्याचं रिलेशन अधिक काळ टिकू शकलं नाही. 

ईशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्याच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. अनन्या सध्या अभिनेत्री विद्या बालनचा दीर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur)ला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. 

अनन्या आणि आदित्य कोणत्या कार्यक्रमात किंवा सिनेमात एकत्र दिसले नाहीत, पण दोघांमध्ये प्रेमाचा गुलाब बहरत असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली आहे. 

अनन्या आणि आदित्य यांनी आपल्या नात्याला मीडिया आणि सोशल मीडियापासून दूर ठेवलं आहे. पण दोघे एकमेकांना डेट करत असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ईशान आणि अनन्या यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली होती. ‘खाली पीली’च्या शूटिंग दरम्यान ते जवळ आले. जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट केले पण आता त्यांचे ब्रेकअप झालं आहे. 

त्याच वेळी, अनन्याचे नाव अभिनेता विजय देवरकोंडासोबतही जोडले जात असल्याचं देखील समोर आलं. दोघेही सिनेमात एकत्र काम करत आहेत. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढल्याचे बोलले जात होते. पण आता अचानक अनन्याच्या लव्ह लाईफमध्ये आदित्य रॉय कपूरचे नाव जोडले गेले आहे. आता यामध्ये किती तथ्य आहे, हे आदित्य आणि अनन्याच सांगू शकतील.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *