Headlines

amol kolhe reaction on har har mahadev movie stop by ncp in thane spb 94

[ad_1]

माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यातील एका मॉलमध्ये सुरू असलेल्या हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “ऐतिहासिक संदर्भांचे पुरावे सेन्सॉर बोर्डकडे…”, ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंची स्पष्ट भूमिका

काय म्हणाले अमोल कोल्हे?

“युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी जी भूमिका मांडली, त्याचे मी १०० टक्के समर्थन करतो. छत्रपती शिवजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहेत आणि हे केवळ म्हणून चालणार नाही, तर त्यांचा योग्य इतिहास सर्वांसमोर मांडला गेला पाहिजे. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड होणार नाही, ही जबाबदारी प्रत्येक चित्रपट निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची आहे. त्यामुळे युवराज संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेचं मी १०० टक्के समर्थन करतो”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

हेही वाचा – हर हर महादेव चित्रपट विरोध : जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, काल ठाण्यातील मॉलमध्ये झालेल्या घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “कालचा ठाण्यात जो प्रकार घडला, मला असा कळलं की यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण करण्यात आली. मी या मारहाणीचं कधीच समर्थन करणार नाही. इतरांची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी करावी, ही माझी भूमिका असते”, असेही ते म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

हर हर महादेव या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी झालेल्या वादातून एक प्रेक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *