Headlines

अमिताभ बच्चन-जया बच्चन यांना नव्हे तर ‘या’ एकमेव व्यक्तीला फॉलो करते अभिनेत्री एश्वर्या बच्चन

[ad_1]

मुंबई :  ऐश्वर्या राय बच्चन ही फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर आणि मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड, साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, ऐश्वर्या इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते. ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी तिला 10 लाखांहून अधिक लोकं फॉलो करतात.

यामध्ये प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, तापसी पन्नू, रणवीर सिंग, करण जोहर, परिणीती चोप्रा, क्रिती सेनॉन, श्रद्धा कपूर, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आहेत. मात्र, ऐश्वर्याने यापैकी कोणालाच फॉलो बॅक करत नाही. तिने अजून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनाही फॉलो केलेलं नाही. ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करायला आवडणारी एकमेव व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचा पती अभिषेक बच्चन आहे.

ऐश्वर्या रायच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर नजर टाकली तर तिने आतापर्यंत २८२ पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याच वेळी, 10.1 दशलक्ष तिचे फॉलोअर्स आहेत. तर ती फक्त एका व्यक्तीला फॉलो करते. ऐश्वर्या राय बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, यावर्षी तिचा ‘पोनियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे जो तमिळ भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी केलं आहे.

अलीकडेच या चित्रपटाबाबत बातमी आली होती की, रिलीज होण्यापूर्वीच OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime ने चित्रपटाचे हक्क १२५ कोटींना विकत घेतले आहेत. त्याचबरोबर पोन्नियिन सेल्वन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. ‘पोन्नियिन सेल्वन’ तामिळ तसेच हिंदी, कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *