Headlines

ऐश्वर्या रायला नववधूच्या लूकमध्ये पाहून चाहते हैराण; फोटो व्हायरल

[ad_1]

मुंबई : सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन एका बिग बजेट चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्याचा आगामी चित्रपट ‘पोन्नियिन सेलवन’ चा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये ऐश्वर्या रायची झलक पाहायला मिळत आहे आणि आता तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

‘पोन्नियिन सेलवन’मध्ये ऐश्वर्या पुन्हा एकदा महाराणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील ऐश्वर्या रायचा लूक तिच्या जुन्या चित्रपटांची आठवण करून देणारा आहे.  

ऐश्वर्याच्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या 1 मिनिट 20 सेकंदाच्या टीझरने हे सिद्ध केलं आहे की, हा चित्रपट केवळ ‘बाहुबली’सारखा इतिहास रचण्यासच तयार नाही तर अभिनय आणि कथेच्या नावावर या चित्रपटावर खूप काम केलं गेलं आहे.  चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिस हादरून जाईल.

या टीझरला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या रॉय इतकी सुंदर दिसत आहे की, तिच्यावरून नजर हटवणं कठीण झालं आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये मोठा सेट, दाग-दागिने, अॅक्शन आणि अभिनय इतका जबरदस्त आहे की, त्यामुळे चित्रपट आणखीनच रंगत आहे.

या चित्रपटाचा 1 मिनिट 20 सेकंदाचा टीझर इतका जबरदस्त आहे की, काही सेकंदांसाठीही तुम्ही टीझरवरून नजर हटवू शकणार नाही. ‘पोन्नियिन सेलवनया चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम आहेत, जे 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. या टीझरमध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन, साऊथ स्टार किचा सुदीप, विक्रम आणि जयम रवीशिवाय इतर अनेक स्टार्स दिसत होते.

टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चाहते या टीझरवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट जवळपास 500 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाचं ऑडिओ हक्क टिप्स कंपनीला 24 कोटींना विकले गेल्याचीही बातमी आहे. या चित्रपटाची रिलीज डेट सध्या 30 सप्टेंबर 2022 आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *