Headlines

Airport वर सुहाना खानला पाहताच मागे आली अनेक मुलं; त्यानंतर झालं असं काही…

[ad_1]

Suhana Khan Viral Video : अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक नसली तरी कायम चर्चेत असते. सुहानाला पाहिल्यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमते. आता देखील सुहानासोबत असंच काही झालं आहे. सध्या सुहानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Suhana Khan Viral Video) तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे. कारण सुहानाला पाहुन बेभान झालेल्या मुलांना पाहून शाहरुखच्या लेकीची अवस्था कॅमेऱ्या कैद झाली आहे. (suhana khan instagram)

व्हिडीओमध्ये सुहानाला विमानतळावर स्पॉट (Suhana Khan Spotted At Airport) करण्यात आलं. सुहानाला पाहिल्यानंतर अनेक मुलं तिच्या मागे आली. मुलं आपल्या मागे येत असल्याचं सुहानाच्या लक्षात देखील आलं. त्यामुळे सुहाना गोंधळली आणि मागे न पाहाता सरळ पुढे निघून गेली. (suhana khan age)

सध्या सुहानाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहलं, ‘सुहानाच्या मागे येणारी मुलं तिला पाहून लाजत का आहेत?’, तर अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘सुहानाने मागे वळून पाहिल्यानंतर मुलं लाजू लागली…’ सध्या सुहानाचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. 

सुहानाचा आगामी सिनेमा 

सुहाना लवकरचं ‘द आर्चीज’ (The Archies) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.  सिनेमा पूर्णपणे मैत्रीवर आधारित असून अनेक नवीन चेहेरे समोर येणार आहेत. (suhana khan movie)

सिनेमात सुहाना शिवाय सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू  अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘द आर्चीज’ मध्ये अगस्त्य नंदा – आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर – बेट्टी कपूर आणि सुहाना खान – वेरोनिका लोज म्हणून झळकणार आहेत. (suhana khan dance)

वाचा : रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच Sara Ali Khan नं सोडलं ऐशोआरामाचं आयुष्य

 

स्टारकिड्सच्या पहिल्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शिका झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’सिनेमा (suhana khan netflix) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा नक्की कधी प्रदर्शित होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *