Headlines

अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ! पहा कुठे रंगणार स्पर्धा

[ad_1]

झी युवा वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजनाचा खजिना उलगडत असते. नवनवीन संकल्पना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात झी युवा वाहिनीचा मोठा वाटा आहे. विशेषतः युवा प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना आवडणाऱ्या कथा ,कार्यक्रम यांची निर्मिती करण्यात झी युवा वाहिनीचा हातखंडा आहे. मालिका चित्रपट नाटक यानंतर आता हौशी रंगकर्मीच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा 2024 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेला झी युवा या वाहिनीची साथ मिळाली आहे. अहमदनगर महा करंडक एकांकिका Powered by झी युवा , स्पर्धेच्या प्राथमिक फेरया महाराष्ट्रातील 6 मुख्य शहरात झाल्या आणि त्याला मुलांचा तुडुंब प्रतिसाद मिळाला . सध्या अंतिम फेरी 18 ते 20  जानेवारीला अहमदनगर येथील माऊली सभागृहात रंगत आहे. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून अहमदनगर महा करंडक स्पर्धेत आपली भूमिका बजावत आहे.

झी युवा ही वाहिनी युवकांच्या मनातील मनोरंजनाला नेहमीच स्थान देत आली आहे . त्याचबरोबर मनोरंजन विश्वातील युवा कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या अहमदनगर महा करंडक एकांकिका पावर्ड बाय झी युवा स्पर्धेत झी युवा वाहिनीचा प्रायोजक म्हणून असलेला सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यभरात हौशी रंगकर्मीसाठी एक उत्तम मंच असलेल्या या स्पर्धेला झी युवा या वाहिनीची साथ मिळाल्याने नाटक क्षेत्रातील अनेक युवा कलाकारांकडून झी युवा या वाहिनीचे विशेष कौतुक होत आहे.

अहमदनगर महा करंडक एकांकिका पावर्ड बाय झी युवा स्पर्धेचं यंदा अकरावे वर्ष आहे . महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा अशी या स्पर्धेची ख्याती आहे.  ‘मेळा रंगकर्मींचा उत्सव रंगभूमीचा’ अशी टॅगलाईन घेऊन अहमदनगर महा करंडक एकांकिका पावर्ड बाय झी युवा स्पर्धा दणक्यात साजरी होत आहे. हौशी रंगभूमीपासून ते व्यावसायिक रंगभूमीला नव्या दमाचे कलाकार देण्यात अहमदनगर महा करंडक एकांकिका पावर्ड बाय झी युवा स्पर्धेचा सिंहाचा वाटा आहे . ही स्पर्धा हौशी नाट्य संस्था आणि महाविद्यालयातील युवा कलाकार यांच्यासाठी खुली आहे. यानिमित्ताने झी युवा ही वाहिनी अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेच्या मंचाला जोडली गेली आहे.  

अहमदनगर  महा करंडक एकांकिका स्पर्धा 2024  या स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि अहमदनगर येथे नुकतीच पार पडली. या फेरीतून महाराष्ट्र राज्यभरातील विविध हौशी नाट्य संस्थांच्या पंचवीस एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. या सर्व एकांकिकांचे सादरीकरण 18 ते 20  जानेवारी या कालावधीत सुरू आहे. या महा करंडक एकांकिका स्पर्धेसाठी अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट, शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांचाही प्रायोजक म्हणून सहभाग आहे. अहमदनगर येथील श्री महावीर प्रतिष्ठान यांच्यावतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे 18 ते 20 जानेवारी यादरम्यान माऊली सभागृहाच्या रंगमंचावर सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत एकांकिका पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळत आहे. या स्पर्धेत परीक्षक म्हणून दिग्गज कलाकार श्री . संजय मोने , श्री . अतुल परचुरे आणि श्रीमती . कृतिका तूळसकर हे काम पाहत आहेत. 

हेही वाचा : अयोध्येत इतकी गर्दी की लक्ष्मणालाच रूम मिळेना! हॉटेल बुकिंगवरून नाराज झाले सुनील लहरी…

रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दुपारी 12 ते 2 पर्यंत होणार आहे आणि त्यानंतर 4 ते 7 या वेळेत उत्सवमूर्ती, कालसर्प आणि कुंकुमार्चन या नॅशनल अवॉर्ड विजेत्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग होणार आहे .



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *