Headlines

सलमान खान आणि अरिजीतमधील वादाला अखेर पूर्णविराम! भाईजानने केली खास पोस्ट शेअर

[ad_1]

Salman Khan and Arijit Singh : ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या चर्चेत आहे. सलमानसगळीकडे या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतो. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात सलमाननं आता एक पोस्ट शेअर केली असून त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. खरंतर सलमाननं ही पोस्ट लोकप्रिय प्ले बॅक सिंगर अरिजीत सिंगसाठी केली आहे. 

सलमाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमान आणि कतरिना कैफ हे दोघेही दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत सलमाननं कॅप्शन देत खुलासा केला की पहिल्या गाण्याची पहिली झलक. लेके प्रभू का नाम! आणि हा, अरिजीत सिंगचं माझ्यासाठी असलेलं हे पहिलं गाणं. 23 ऑक्टोबरला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर हा चित्रपट 12 नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान, या आधी अरिजीतचा एक सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात सलमान खानच्या घरातून अरिजीत सिंग बाहेर येत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावरून त्या दोघांमधील वाद संपले का अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्यावर कोणी काही बोललं नव्हतं. आता सलमाननं शेअर केलेल्या पोस्टनं अखेर ही गोष्ट समोर आली आहे की 9 वर्षे जुना वाद संपला आहे. 

कधी झाला होता वाद!

2014 मध्ये त्या दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद अवॉर्ड फंक्शन दरम्यान, झाला होता. सलमान या शोचे सुत्रसंचालन करत होता. सलमाननं अवॉर्डसाठी अरिजीतचं नाव घेतं घोषणा केली की तू विनर आहेस. त्यावर कॅज्युअल ड्रेसमध्ये असलेला अरिजीत म्हणाला की तुम्ही लोकांना झोपवलं. त्यानंतर सलमान खाननं त्याच्या फिल्मों ‘बजरंदी भाईजान’, ‘किक’ आणि ‘सुल्तान’ चित्रपटातील सगळी गाणी कोणा दुसऱ्याला दिली होती. 

हेही वाचा : ‘जास्तीत जास्त 6 महिने जगेल…’, ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्रीनं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव

या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही आदित्य चोप्रा यांनी यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात सलमान, कतरिना आणि इमरान महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टाइगर’  आणि 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाइगर जिंदा है’ या फ्रेन्चायझीमधील तिसरा भाग आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुर्हुतावर प्रदर्शित होणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *