Headlines

Pathaan च्या यशानंतर आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

[ad_1]

Shah Rukh Khan And Kajol’s DDLJ Will Released Once Again in India : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘पठाण’ (Pathaan)  या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या सगळ्यात शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शाहरुखनं आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यापैकी एक म्हणजे शाहरुख आणि अभिनेत्री काजोलचा (Kajol) ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) हा चित्रपट. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) हा चित्रपट भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ थिएटरमध्ये चालणारा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आजही आतुर असतात. दरम्यान, व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s Day)  निमित्तानं हा चिठत्रपट पुन्हा एकदा संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सनं याबातमीला दुजोरा दिला आहे. पिढ्यानपिढ्या पाहिला जात असून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर रोमान्सचं प्रतिक ठरला आहे. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायचा आहे. त्यांना आता भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. (Valentine’s Day Special) 

शाहरुख आणि काजोलचा हा चित्रपट 10 फेब्रुवारीपासून संपूर्ण भारतात एका आठवड्यासाठी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत, वडोदरा, गुडगाव, फरीदाबाद, लखनऊ, नोएडा, देहरादून, दिल्ली, चंडीगढ, कोलकाता, गुवाहाटी, बेंगलुरू,हैदराबाद, इंदूर, चेन्नई वेल्लोर आणि त्रिवेंद्रमसोबतच भारताती 37 पेक्षा जास्त शहरांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे कारण व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं शाहरुख खानचा फक्त पठाण नाही तर डीडीएलचे हा चित्रपट पाहता येणार आहे. (Dilwale Dulhania Le Jayenge Will Release Once Again) दरम्यान, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाल्यापासून मुंबईतील मराठा मंदीर या चित्रपटगृहात अजूनही पाहायला मिळतो. 

हेही वाचा : Kiara कडे सर्वाधिक महागडं मंगळसुत्र, पण चर्चा मात्र ‘या’ अभिनेत्रींच्या सौभाग्याच्या लेण्याची

यशराज फिल्मचा उराध्यक्ष, रोहन मल्होत्रा म्हणाले, ‘YRF आणि SRK हे केवळ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरचे समानार्थी शब्द नाहीत, तर ते अशा चित्रपटांचे भागीदार आहेत ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन जीवन दिले. इतकंच काय तर त्यांनी संस्कृतीवर केलेला प्रभाव हा कायमच आहे. हा एक अद्भुत योग आहे असं म्हणायला हरकत नाही, की DDLJ हा चित्रपट 25 वर्षे प्रदर्शित झाला. यंदाच्या वर्षी पठाणसोबतच इतिहास होणार आहे. कारण पठाण हा YRF चे 50 वर्षे साजरी करत आहे तर जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *