Headlines

शूटिंग थांबवून प्रवीण तरडेने आई-वडिलांना घडवलं विठ्ठल दर्शन; म्हणाला, विठ्ठलाकडे पाहताच…

[ad_1]

Pravin Tarde Facebook Post: महाराष्ट्रासाठी आषाढी एकादशीचा (Aashadi Ekadashi) सण अत्यंत महत्त्वाचा आहे. विठुरायाच्या (Vitthal Darshan) दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur) वैष्णवांचा मेळावा जमतो. अठरा ते वीस दिवस पायी वारीत चालल्यानंतर विठुरायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना असते. आज लाखोंच्या संख्येने वारकरी (Ashadi Ekadashi Wari)  पंढरीत दाखल झाले आहेत. वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आज अनेक तरुण मंडळीही वारीत सहभागी होतात. तर, कलाकारांनाही विठुरायाच्या दर्शनाचा मोह आवरत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनीही विठ्ठलाच्या भेटीचा खास अनुभव शेअर केला आहे. 

प्रवीण तरडे यांची फेसबुक पोस्ट

अभिनेते प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आई-वडिलांना विठ्ठलाचे दर्शन घडवले आहे. त्यासोबतच फेसबुकवर एक अनुभवदेखील मांडला आहे. काही महिन्यांपूर्वी आईवडीलांना म्हणालो बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय? तुम्ही म्हणाल तिथं घेउन जातो, म्हणाल त्या देशात ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल. मी म्हणालो पंढरपूर? का? तर ते म्हणाले की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून पाहिलं नाही, धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा. आता जरा निरखून पहायचाय, असं त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडले आहे.

चाहत्यांच्या पोस्टवर कमेंट

प्रवीण तरडे यांनी पुढे लिहले आहे की, मग एका एकादशीला शुटींग -बिटींग सगळं थांबवून दोघांना घेउन गेलो पंढरपूरला. विठ्ठलाकडे एकटक बघत बराच वेळ रडतच होते दोघं. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलं की वारीची ही परंपरा ईतकी वर्ष का टिकून आहे. पन्नास वर्ष चालत जातायेत तरी ट्रीपला कुठं जायचंय म्हटल्यावर त्यांना पंढरपूरच आठवलं. प्रवीण तरडे यांच्या फेसबुक पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

 

आई-वडिलांसोबत फोटो केला पोस्ट

प्रवीण तरडे यांनी विठ्ठलाचे दर्शना घेतानाचे दोन फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत ते विठ्ठल मंदिरात आई-वडिलांसोबत दिसत आहेत. तर, दुसऱ्या एका फोटोत प्रवीण तरडे यांचे आई-वडिल विठ्ठलासमोर हात-जोडून उभे असल्याचं दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे दिसत आहे.  प्रवीण यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 

दरम्यान, प्रवीण तरडे हे एका सामान्य वारकरी कुटुंबात लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल तर आईचे नाव रुक्मिणी आहे. अनेकांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत ही माहिती दिली आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *