Headlines

‘बाथरूममध्ये जाऊन…’, अनेक दिवसांनंतर दिग्दर्शकाची पोलखोल, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कटु अनुभव, वाचा नेमकं प्रकरण

[ad_1]

Shiny Doshi On Director Sanjay Leela Bhansali: बॉलीवूडमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नाही. कुणावर कधी कोणता निशाणा लागेल याचाही काही नेम नाही. बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांवर एका अभिनेत्रीने आपला त्यांच्यासोबतचा काम केल्याचा वाईट अनुभव शेअर केला आहे. 

संजय लीला भन्साळी हे बॉलीवूड जगतातील एक मोठं नावं आहे. त्यांनी आजतागायत सर्वात बिग बजेट फिल्म्स केल्या आहेत. अगदी देवदासपासून ते आत्ताच्या गंगुबाई काठियावाडीपर्यंत त्याच्या सिनेमातील भव्य सेट आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटांना भरभरून गर्दी केली आहे. मध्यंतरी त्यांचे चित्रपट हे वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते. 

नुकत्याच एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने संजय लीला भन्साळींसोबतचा एक कटु अनुभव सांगितला आहे. शायनी दोशी या अभिनेत्रीने हा आपला अनुभव शेअर केला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत शायनीने बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘सरस्वतीचंद्र’ या टीव्ही शोच्या शूटिंगच्या दिवसांतले काही कटु अनुभव सांगितले आहेत. 

‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री शायनी दोशीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक नवोदित कलाकाराप्रमाणेच त्यानेही इंडस्ट्रीत नाव कमवण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्याचवेळी, अलीकडेच एका मुलाखतीत शायनीने बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘सरस्वतीचंद्र’ या डेब्यू टीव्ही शोच्या शूटिंगचे दिवस आठवून धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने खुलासा केला की ती इंडस्ट्रीत नवीन असल्याने तिला अभिनय येत नव्हता.

शायनी दोसीने मुलाखतीत खुलासा केला की संजय लीला भन्साळी जवळजवळ दररोज तिला शिव्या देत होते या त्रासामुळे शो सोडण्याचीही वेळ तिच्यावर आली होती. शायनीने सांगितले की, ‘मी 2012 मध्ये सरस्वतीचंद्रचा पायलट एपिसोड शूट केला होता. तेव्हा मला काहीच माहीत नव्हते. त्यामुळे माझे दिग्दर्शक माझ्यावर ओरडायचे. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणं होतं. मी शिव्या खालल्या आहेत आणि वॉशरूममध्ये जाऊन खूप रडले आहे. 

2013 मध्ये शायनी दोशीने संजय लीला भन्साळीच्या टीव्ही शो ‘सरस्वतीचंद्र’मधून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. याशोनंतर तिने ‘सरोजिनी – एक नई पहल’, ‘जमाई राजा’ आणि ‘श्रीमद भागवत महापुराण’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले. याशिवाय शायनीने ‘खतरों के खिलाडी 8’ मध्येही भाग घेतला होता. सध्या शायनी स्टार प्लसच्या शो ‘पंड्या स्टोर’मध्ये ती मध्यवर्ती भुमिका करते आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *