Headlines

अभिनेत्री पूजा सावंतला जास्त चित्रपट न मिळण्याचं अजब कारण पाहिलं का? स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासा

[ad_1]

Pooja Sawant : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत ही दगडी चाळ या चित्रपटासाठी ओळखली जाते. या चित्रपटातील भूमिकेतून पूजानं सगळ्यांची मने जिंकली. खरंतर पूजानं 2010 साली क्षणभर विश्रांती या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पूजा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजानं तिला कमी काम मिळत असल्याचं सांगितलं आहे. 

पूजा सावंतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास सांगितला आहे. यावेळी एक तिला चित्रपटसृष्टीत काम न मिळत असल्याची खंत व्यक्त करत त्याचं कारण सांगत पूजा म्हणाली, अनेकदा मला चित्रपटांच्या ऑफर मिळतात पण माझी उंची जास्त असल्यामुळे पुढे काही होतं नाही. त्यासाठी कथानक किती चांगलं आहे किंवा ते मला आवडलं यावर अवलंबून नसतं तर त्या चित्रपटात अभिनेता कोण असणार त्यावर मी त्या चित्रपटात असणार की नाही हे ठरतं. त्यातही जर अभिनेत्याची उंची जास्त नसेल तर मला रिजेक्ट करण्यात येतं. त्याविषयी पुढे सांगत पूजा म्हणाली की आज जर माझ्याकडे पाच चित्रपटांची ऑफर असेल तर त्यातून मला काही चित्रपट करता येत नाहीत, निवडक चित्रपट करता येतात. मात्र, ज्यांच्यासोबत मी चित्रपट केले किंवा थोडक्यात काम केलं ते आज माझे चांगले मित्र आहेत. 

पुढे पूजा सेलिब्रिटींना होणाऱ्या ट्रोलिंगवर बोलताना म्हणाली की ‘मला तरी या सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सचा खूप त्रास होतो. निगेटिव्ह कमेंट पाहिलं की मी वाचून लगेच ती डिलीट करते. मला तर वाटतं की जे हे ट्रोल करतात त्यानी आधी स्वत: ची लायकी पाहायला हवी आणि मग ट्रोल करावं. प्रत्येकामध्ये काहीतरी कमी असतं हे आपण सगळ्यांनी मान्य करायला हवे.’

हेही वाचा : प्रत्येक रविवार कसा असायला हवा सांगत; प्राजक्ता माळीनं शेअर केला खास व्हिडीओ

पूजाच्या कामाविषयी बोलायचं झाले तर तिनं आजवर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालच्या जंगली या चित्रपटात दिसली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *