Headlines

अभिनेत्री नव्हे, यावेळी होतेय एका अभिनेच्याच्या न्यूड सीनची चर्चा

[ad_1]

मुंबई :  तुम्हाला कोणी फिरंगी बाबा माहिती आहे का? या बाबाचं नाव तरी ऐकलं आहे का? नाही ना, तर आज आम्ही तुम्हाला सांगतो. नवीन वेबसीरीज आली आहे. तिचं नाव आहे डॉक्टर अरोडा. या वेबसीरीजने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. ही सीरीज सेक्स समस्यांविषयी असलेला टॅबूला तोडणारी आहे. या सीरीजमधील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभियन केला आहे. पण या सीरीजमधील एक पात्र हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. ही सीरीज ज्यांनी पाहिली आहे त्या प्रेक्षकांच्या मनात हे पात्र लक्षात आहे. 

या पात्राचं नाव आहे फिरंगी बाबा. या सीरीजमध्ये हे पात्र अभिनेता राज अर्जुन याने केलं आहे. अर्जुन हे हिंदी चित्रपटसृष्टीत नाही तर मल्याळम, तमिळ, तेलुगू चित्रपटातही त्यांचं काम गाजलं आहे. या सीरीजमधील अभिनयामुळे अर्जुनची फिरंगी बाबा या पात्राविषय सर्वत्र चर्चा आहे. ज्यांनी ही सीरीज पाहिली आहे तो प्रत्येक फिरंगी बाबा या पात्राला विसरू शकत नाही. 

विशेष म्हणजे या सीरीजच्या पोस्टवर आणि ट्रेलरमध्ये हे पात्र दाखविण्यात आलं नव्हतं. यामागील कारणही ही सीरीज पाहिल्यावर कळतं की त्याची भूमिका का गुप्त ठेवण्यात आली होती.  अर्जुनने फिरंगी बाबा हे पात्र इतक्या सुंदर पद्धतीने मांडलं आहे की त्याचा अभिनय, लूक आणि डायलॉग हे प्रेक्षकांचे मन जिंकते. 

या पात्राचं अजून एक खासयित आहे, या सीरीजमध्ये अर्जुनने न्यूड सीन दिला आहेत. या सीरीजमध्ये फिरंगी बाबा एक आश्रम चालवतो. तिथे येणाऱ्या अनेक महिलाभक्त बाबांना वैयक्तिक भेटण्याची मागणी करतात. या सर्व महिलाभक्तांची मागणी पूर्ण करता करता फिरंगी बाबाला वेदना होतात. मग यासाठी त्यांना सेक्सोलॉजिस्टची भेटण्याची गरज असते. पण फिरंगी बाबा हे प्रसिद्ध असल्यामुळे ते डॉक्टर अरोराला गुपचूप रेल्वे स्टेशनवर भेटतो. स्टेशनवर आता डॉक्टर अरोडा त्याची तपासणी करायला घेतात तेवढ्यात तिथे लोकं जमा होतात. लोकं फिरंगी बाबाचे कपडे हिसकावतात. फिरंगी बाबा आपला चेहरा लपवण्यासाठी न्यूडच पळत सुटतो. त्यानंतर फिरंगी बाबाची जी परिस्थिती झाली ती पाहण्यासारखी आहे. अर्जुनचा हा सीन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

अर्जुनने यापूर्वी ब्लॅक फ्रायडे, रईस, सीक्रेट सुपरस्टार, शेरशाह, थलाइवी, लव्ह हॉस्टेल या चित्रपटात अभिनय केला आहे. तर साईबाबा हा भूमिकेसाठी तो चर्चेत राहिला. सतर अर्जुन साऊथ इंडस्ट्रीचाही तो प्रसिद्ध चेहरा आहे. नुकताच आलेला डिअर कॉम्रेडमध्येही त्याने काम केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *