Headlines

मराठी मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते काळाच्या पडद्याआड

[ad_1]

Marathi Actor Parag Bedekar passes away : ‘मैत्री सोडून एवढ्या लांब गेलास? गेलास तो गेलास पुन्हा कधीच भेट होऊच शकत नाही ह्या जन्मात एवढ्या लांब..?’ असं म्हणत अभिनेता सागर खेडेकरने (Sagarh Khedekaar) अभिनेते पराग बेडेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. पराग बेडेकर (parag bedekar) यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पराग यांनी वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं… असं म्हणायला हरकत नाही. 

पराग बेडेकर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पराग यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केली आहे. प्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले यांनी देखील फेसबूकवर पोस्ट करत पराग यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. 

पराग यांचा फोटो पोस्ट करत चंद्रशेखर गोखले (Chandrashekar Gokhale) म्हणाले; ‘पराग गेला? उत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वताहाच्या काही खास लकबी होत्या बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाईल होती मी त्या वरून छेडलं की छान हसायचा हास्य तर लाजवाब होतं त्याचं कुठे गेला कुठे गेला हा शोध आज अचानक थांबला…’

एवढंच नाही तर सागर खेडेकरने पुन्हा कधीच भेट होवू शकत नाही असं म्हणत दुःख व्यक्त केलं आहे. ‘पराग बेडेकर अरे आपल्याला एकत्र पुन्हा एकदा नाटक करायचं होतं ना ? मग ? यदाकदाचित, लाली लीला ह्या दोन नाटकांवरच मैत्री सोडून एवढ्या लांब गेलास? गेलास तो गेलास पुन्हा कधीच भेट होऊच शकत नाही ह्या जन्मात एवढ्या लांब.. ? असो बरं वाटत असेल तुला कदाचित पण यार आम्हाला दुःखी करून गेलास… मिस करीन तुला यार… जिथे कुठे असशील सुखी राहा मित्रा… पऱ्या तुझ्या आत्म्यास शांती मिळो.’ (marathi actor parag bedekar)

पराग खेडेकर यांची कारकिर्द

पराग खेडेकर यांनी अनेक नाटक आणि मालिकेतून चाहत्यांच्या मनात घर केलं. ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘लाली लीला’ ‘यदा कदाचित’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘पोपटपंची’ या नाटकांमध्ये पराग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (marathi actor parag bedekar death news)

तर मालिकांमध्ये अभिनय करत पराग घरा-घरात पोहोचले. ‘कुंकू’, ‘चारचौघी’, ‘एक झुंझ वादळाशी’, ‘ओढ लावी जिवा’, ‘आभाळमाया’ या मालिकांमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल. (Marathi Actor Parag Bedekar passes away)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *