Headlines

Abortion Rights : गर्भपात नाही करु शकणार देशातील महिला; निर्णयानं अभिनेत्रीही संतापल्या

[ad_1]

Abortion Rights : शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम झाल्यानंतरच महिला गरोदरपणाचा निर्णय घेतान दिसतात. अनेकदा परिस्थिती आणि काही प्रसंगांमुळं त्यांना गर्भपाताचाही निर्णय घ्यावा लागतो. पण, आता मात्र असं करता येणार नाही आहे. सर्वोच्च न्यायालयानंच हा निर्णय सुनावल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Bollywood Actress priyanka chopra on Abortion Rights news america supreme court gun rights)

कलाकारांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचं नाव यामध्ये आघाडीवर आहे. रो विरुद्ध वेड प्रकरणातील निर्णय देताना अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालानं अतिशय महत्त्वाची बाब जाहीर केली. 

कोणतीही महिला परवानगीशिवाय गर्भपात करु शकणार नाही, असं या निर्णयात म्हटलं गेलं. प्रियांकापर्यंत ही बातमी पोहोचताच तिनं यावर आपलं ठाम मत मांडलं. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याच संस्थांशी जोडल्या गेलेल्या प्रियांकानं एक इन्स्टा पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिनं एक कार्टून, तर मिशेल ओबामा यांची पोस्टही रिशेअर केली. 

बराक ओबामा यांच्या पत्नी, मिशेल यांचाही निर्णय़ाला कडाडून विरोध
या निर्णयानं आपल्या काळजावर घाव केल्याचं त्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून म्हणाल्या. 

‘हो आज माझ्या काळजावर घाव घातला गेला आहे. एक तारुण्यावस्थेतील मुलगी आज तिचं शिक्षणही पूर्ण करण्याच्या स्थितीत नाही. तिला ठाऊकही नाही ती आयुष्याचा निर्वाह कसा करेल. हे सर्व यामुळे की आता कायदा तिच्या गरोदरपणावर निर्णय देत आहे. 

पाल्याचं पालनपोषण करण्यासाठी असमर्थ असणाऱ्या महिला आता नाईलाजानं बाळांना जन्म देतील. त्यांचे पालक आपल्याच मुलांचं आयुष्य भध्वस्त होताना पाहणार आहेत. आरोग्य विभागातील कुणीही त्यांची इथं मदत करु शकत नाही, कारण त्यांना कारावासाची भीती आहे.’

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या निर्णयावर सध्या जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तुमचं यावर काय मत?  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *