Headlines

‘अब्दुल सत्तार जोकर, त्यांना तमाशात पाठवा,’ सुप्रिया सुळेंवरील टिप्पणीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची टीका | ncp youth wing president mahebub shaikh criticizes abdul sattar for commenting on supriya sule

[ad_1]

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. सत्तार यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तार यांचा जोपर्यंत राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असा इशार राष्ट्रवादीने दिला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सत्तार यांच्याविरोधातील आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. सत्तार हे जोकर आहेत. त्यांना एखादे नाटक किंवा तमाशात भूमिका द्यायला हवी, अशा शब्दांत टीका केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> हर हर महादेव चित्रपट विरोध : जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

“अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही शिंदे-फडणवीस सरकारला अल्टिमेटम दिलं होतं. आता अब्दुल गद्दार यांचा महाराष्ट्रात कसा कार्यक्रम होतो, याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाहणार आहे. अब्दुल गद्दार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केली आहे. ते ऐकून एखाद्या सामान्य युवकाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. मात्र आमच्या अंगावर कोणी आलं तर त्याला शिंगावर घेण्याची ताकद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. सत्तार यांच्या विधानानंतर औरंगाबाद, सिल्लोड तसेच मुंबईमध्ये जे पडसाद उमटले ते किरकोळ आहेत. उद्या आम्ही यापेक्षा उग्र अवतार धारण करणार आहोत,” असे मेहबूब शेख म्हणाले.

हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन थोबाडीत…”

“सत्तार राजकारणातील जोकर आहेत. सत्तार यांना धडा शिकवण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे. ते आमच्या नेत्यांविषयी बोलत असतील, तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सत्तार हे शिंदे-फडणवीस यांचे वाचाळवीर आहेत. सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची त्यांची हिंमत नाही. यांना सरकार वाचवण्यासाठी अशा वाचाळवीरांसमोर नतमस्तक व्हावे लागत आहे. सत्तार राज्याचे कृषीमंत्री असल्यामुळे जनतेला लाज वाटत आहे. राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे हैराण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीत ते जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का? असे विचारतात. शिंदे- फडणवीस यांनी असे जोकर ठेवले आहेत. त्यांनादेखील लाज वाटायला हवी. सत्तार यांना जोकरची भूमिका पार पाडण्यासाठी नाटक किंवा तमाशात पाठवावे,” असा आक्रमक पवित्रा मेहबूब शेख यांनी घेतला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *