Headlines

आधी भाई आणि आता ‘जान’…, रजिस्टर मॅरेजनंतर Swara Bhaskar ट्रोलर्सच्या निशाण्यावर

[ad_1]

Swara Bhaskar Marriage: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. फहाद अहमद नक्की आहे तरी कोण? याकडेही सगळ्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे की स्वरा आणि फहाद हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्या दोघांनी याचा खुलासा केला होता. स्वरा आणि फहाद यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत त्या दोघांना पाहून स्वराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. (Swara Bhaskar Troll)

स्वरा आणि फहाद अहमदचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलानं शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला स्वरा आणि फहाद हे पापाराझींना पोज देताना दिसत आहे. दरम्यान, यावेळी सगळे शुभेच्छा देत असताना अचानक फहाद बोलतात की सर, लग्न अजून मार्चमध्ये होणार आहे. त्यावर लगेच स्वरा बोलते ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’. स्वरा आणि फहाद यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर आता सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाची तारिख काय असेल असा विचार करत आहेत. 

दरम्यान, दुसरीकडे त्या दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागाला आहे. एक नेटकरी म्हणाला, माझ्याकडून फ्रीज गिफ्ट. दुसरा नेटकरी म्हणाला, प्रेगन्टं असेल. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी स्वराच्या एका ट्वीटवर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. स्वरानं फहादसोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हणाली की, “जन्मदिनाच्या शुभेच्छा फहद मिया. भाईचा आत्मविश्वास असाच कायम राहो. आनंदी राहा आणि असंच काम करत राहा. आता वय वाढत चाललंय, लग्न करा. तुझा वाढदिवस आणि हे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी चांगलं जाओ मित्रा.” त्यावर स्वराला उत्तर देत फहाद म्हणाला होता की “धन्यवाद जरनवाजी मैत्रिणी. भावाच्या आत्मविश्वासाने झेंडा उंचावला आहे, तो अबाधित राहणे आवश्यक आहे आणि हो, तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होते, त्यामुळे वेळ काढा, मला मुलगी सापडली आहे.”

हेही वाचा : Swara Bhaskar Marriage: ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, रजिस्टर मॅरेजनंतर स्वरा भास्करनं का केला असा इशारा
 

हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला आता ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हे ट्वीट पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हे ज्या प्रकारे बोलत होते हे तर भाऊ-बहीण म्हणून वाटत आहेत. त्यावर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “तुम्ही दोघांनी कोणता क्रॅश कोर्स केला आहे का? की मागच्या 15 दिवसांत व्हॅलेंटाईनचा परिणाम झाला तुमच्यावर?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तुम्ही दोघं तर एकमेकांचे भाऊ-बहीण होता ना.” तर तिसरा नेटकरी म्हणाला की, “चला तुम्ही दोघं एकमेकांना लग्नाबद्दल विचारत होता आणि आता एकमेकांशीच लग्न केलं. पण जर लग्न करायचंच होतं तर मग त्याला भाऊ का बोललीस.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “आधी भाई होता आता जान झाला.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *