Headlines

गर्दीतून मार्ग काढत असताना एक तरुण अनुष्काजवळ आल्याचं पाहताच संतापला विराट, त्यानंतर…; VIDEO व्हायरल

[ad_1]

Virat Gets Angry: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) सध्या काही निवांत वेळ घालवताना दिसत आहे. नुकतंच दोघांनीही बंगळुरुमधील प्रसिद्ध भोजनालयाला भेट दिला. सेंट्रल टिफिन रुममध्ये (Central Tiffin Room) दोघांनीही जेवणाचा आस्वाद घेतला. दरम्यान विराट आणि अनुष्का भोजनालयात आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि दोघांनाही पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली. 

अनुष्का आणि विराटने सेंट्रल टिफिन रुममध्ये अस्सल चवीचा आस्वाद घेतला. यानंतर त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांसोबत गप्पा मारत फोटोही काढले. पण जेव्हा तेथील जेवण आटोपून विराट आणि अनुष्का जाण्यासाठी निघू लागले तेव्हा बाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. विराट आणि अनुष्काला एक क्षण पाहता यावं, फोटो मिळावा यासाठी त्यांची धडपड सुरु होती.

गर्दी इतकी झाली होती की, विराट आणि अनुष्काला भोजनालयातून बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. अखेर त्यांचे मित्र, सुरक्षासरक्षक यांनी त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्ग करु दिला. मात्र यावेळीही त्यांचे चाहते माघार घेण्यास तयार होत नव्हते. लोकांकडून एकमेकांना धक्काबुक्की केली जात होती. अखेर काही वेळाने अनुष्का आणि विराट बाहेर पडतात. यावेळी विराट अनुष्काला सांभाळून कारपर्यंत नेत होता. 

पण कारजवळ पोहोचताच एका चाहत्याने सुरक्षाकडं तोडलं आणि अनुष्काजवळ पोहोचत फोटो देण्याची मागणी करु लागला. हे पाहिल्यानंतर विराट कोहली त्याच्यावर चांगलाच संतापला आणि अनुष्कापासून दूर होण्यास सांगितलं. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, या चाहत्याने कारचा दरवाजाच ब्लॉक करुन टाकला होता. यामुळे विराट कोहली चिडला आणि त्याला बाजूला हो म्हणाला. 

अनुष्का आणि विराटने बंगळुरुमधील भोजनालयाला दिली भेट

अनुष्काने इन्स्टाग्रामवर सेंट्रल टिफिन रुममध्ये गेल्याचे फोटो शेअर केले होते. यानंतर भोजनालयाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर देखील विराट आणि अनुष्काचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. “आज आमच्यात कोण सामील झाले ते पहा! दिग्गज विराट कोहली आणि सुंदर अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत भेटून खूप आनंद झाला. तुमच्या शब्दांनी आणि शुभेच्छांनी आमचा उत्साह वाढवला आहे. तुम्हाला पुन्हा भेटण्याची वाट पाहत आहोत ( sic),” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *