Headlines

AI विरोधात हॉलिवूडचा सर्वात मोठा संप मिटला! टॉम क्रूझने पाठिंबा दिलेल्या आंदोलनाबद्दल A To Z

[ad_1]

Hollywood writers strike : AI च्या तंत्रज्ञानाची ओळख साऱ्या जगाला झाली त्या क्षणापासूनच एखाद्या संशोधनाविषयी आनंद व्यक्त करण्यापेक्षा अनेकांनी चिंतेचाच सुर आळवला. यामागं कारणंही तशीच होती. हॉलिवूडमध्ये तर लेखक आणि काही निर्मिती संस्थांनी याविरोधात संप पुकारल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता जवळपास 146 ते 150 दिवसांनंतर Writers Guild of America आणि मोशन पिक्चर्समध्ये सुरु असणाऱ्या चर्चांमधून या प्रकरणावर तोडगा शोधण्यात आला आहे. ज्यामुळं तात्पुरत्या स्वरुपात हा संप निकाली निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

मे 2023 पासून सुरु असणारा हा संप हॉलिवूडमधील गेल्या 63 वर्षांतील एक असा पहिला संप ठरला आहे ज्यामुळं बहुतांश सिनेजतच बंद बडल्याचं चित्र समोर आलं होतं. राहिला मुद्दा हा संप का पुकारण्यात आलेला याविषयी, तर तेसुद्धा समजून घ्या. 

द स्क्रीन एक्टर्स गिल्ड (एसएजी-एएफटीआरए) साधारण 160,000 करत असून, त्यांनी या संपाच्या निमित्तानं कमी वेतन आणि एआयचा कलाजगताचा असणारा धोका असे मुद्दे अधोरेखित केले होते. हॉलिवूड जगत मोठं दिसत असलं तरीही कोरोनानंतरची आव्हानं आणि इतर संकटांमुळं अनेक संकटं निर्मिती संस्थांपुढे उभी राहिली. ज्यानंतर स्ट्रीमिंग वाढवण्याची मागणी सातत्यानं होताना दिसली. ज्यामध्ये कलाकार आणि लेखकांनीही चांगलं वेतन, मानधन आणि Job Security ला प्राधान्य दिलं. यामध्ये कामाचे तास, पेंशन योजना, आरोग्य सुविधा असे मुद्देही अधोरेखित करण्यात आले होते. 

आघाडीवर असणाऱ्या कलाकारांनी एका काहगदावर स्वाक्षऱ्या केल्या आणि… 

बऱ्याच ए-लिस्ट कलाकारंनी मागील महिन्यामध्ये गिल्ड लीडरशिपच्या एका पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. आपण संपासाठी तयार असून, या टप्प्यानंतर कलाजगतामध्ये एक अभूतपूर्व बदल येईल असं या पत्रामध्ये म्हटलं गेलं होतं. SAG-AFTRA संघटनेच्या प्रमुखपदी असणाऱ्या कन क्रैबट्री-आयरलंड यांनी याबाबतची माहिती दिली होती. 

कलाजगतावर संपाचा परिणाम… 

कोरोनानंतर कलाजगताला पुन्हा नव्या अंदाजात उभं करण्यासाठी अनेक आव्हानं येत असतानाच या संपामुळं आगामी प्रोजेक्ट्सवरही त्याचे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. संपामुळं काही मोठे चित्रपटही अडखळले. असं असलं तरीही काही चित्रपट मात्र इथं अपवाद ठरले. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझनंही या संपाला पाठिंबा दिला होता. त्याच्याव्यतिरिक्तही इतर कलाकारांनी या संपाला समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं होतं. 

 

राहिला मुद्दा बॉलिवूडवरही ही वेळ येण्याचा तर, कलाविश्वामध्ये सेलिब्रिटी मंडळींशिवायही इतरही कलाकारांची एक मोठी फळी कार्यरत असते. त्यामुळं एआयचा वापर, त्यामुळं धोक्यात असणाऱ्या नोकऱ्या आणि या वर्गाच्या काही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याच बॉलिवूडमध्येही ही लाट येण्यास उशिर लागणार नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *